लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्याच्या स्थितीत समाज दिशाहीन होत चालला आहे .समाजात अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती वाढीस लागल्या आहेत. समाज बुद्धाची शिकवण विसरला आहे. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी धम्म परिषदांचे आयोजन केले जाते, असे प्रतिपादन भंते प्रा. सुमेधबोधी महाथेरो यांनी केले.हिंगोली येथे १५ डिसेंबर रोजी श्रावस्ती बुद्ध विहार आनंदनगर येथे भंते प्रा. सुमेध बोधी महाथेरो यांच्या उपसंपदेला ४५ वर्ष पूर्ण होत असल्याबाबत त्यांची नाणेतुला व एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंते प्रज्ञा बोधी, भंते नागघोष, भंते शाक्यपुत्र, भंते अमृतानंद, भंते करूणाबोधी, भंते धम्मदीप, भंते काश्यप थेरो, भंते मुदितानंद, भंते सदानंद भंते दीपांकर, भंते महामोगलायण, भंते प्रज्ञाघोष, भंते करुणाकीर्ती, भंते दयानंद, भंते, भंते आनंद, भंते शिलकीर्ती, भंते संघबोधी, भंते रोहन, भंते अश्वघोष, भंते धम्मकीर्ति, भंते कमलशील, भंते गौतम, भंते सत्यधम्मो, भंते धम्मशील, भंते प्रज्ञाबोधी असे राज्यभरातील भंतेजीची उपस्थिती होती. तसेच डॉ. सिध्दार्थ जोधंळे, गोपाळराव आटोटे, गणेशराव पडघण आदी उपस्थित होते. नाणेतुलाला उत्तर देताना भंते सुमेधबोधी म्हणाले की माझी जी नाणेतुला करण्यात आली आहे त्या तुलेमधून मिळालेली रक्कम वटफळी येथील अनाथाश्रमासाठी देणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थीत अन्य भंतेनी धम्मदेसना दिली. कार्यक्रमात आ.तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते संरक्षण भिंत कामाचे भूमिपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. प्रसिद्ध कवी व गीतकार सूर्यकांत भगत, गायक प्रकाश दांडेकर यांचा गायणाचा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक भंते एच.धम्मदीप थेरो यांनी केले. आभार भंते एस. राहुल यांनी मानले. अल्पोपाहाराची व्यवस्था मिलींद उबाळे व मिलींद पडघण यांनी केली. यशस्वीतेसाठी शांताबाई मोरे, रामचंद्र वाढे, जयाजी पाईकराव, प्रेमेंद्र वानखेडे तसेच श्रावस्ती बुध्द विहार संयोजन समिती, ज्ञानसागर महिला मंडळ, भीम आर्मी आदींनी परिश्रम घेतले.
संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी धम्म परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:14 AM