हिंगोलीत विजयी व पराभूत उमेदवारांत फरक अवघा 0.१६ टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:19 PM2019-04-06T14:19:29+5:302019-04-06T14:20:22+5:30

फरकापेक्षा दहापट मते इतरांना

The difference between winning and defeating candidates in Hingoli is 0.16 percent | हिंगोलीत विजयी व पराभूत उमेदवारांत फरक अवघा 0.१६ टक्का

हिंगोलीत विजयी व पराभूत उमेदवारांत फरक अवघा 0.१६ टक्का

Next

- विजय पाटील, हिंगोली

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी व पराभूत उमेदवारांतील मतांमध्ये फरक केवळ 0.१६ टक्क्याचा होता. सर्वात कमी फरकाने निवडून आलेली महाराष्ट्रातील ही जागा ठरली. त्यावेळी रिंगणात असलेल्या इतर २१ उमेदवारांनी ११.२३ टक्के मते मिळविली होती. 

मागच्या निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराने मिळविलेली मते लक्षणीय होती. भारिप या निवडणुकीत ९५७७ मते मिळवत बहुजन मुक्तीच्याही मागे पडली. त्यामुळे काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसला या धर्मनिरपेक्ष मतांमध्ये होणाऱ्या विभाजनाचा नेहमी बसणारा फटका मागच्या वेळी बसला नाही. नामसाधर्म्याच्या उमेदवारांचाही सातव यांच्यापेक्षा सुभाष वानखेडे यांनाच जास्त फटका बसला होता. वानखेडे नावाच्या दोघांनी बारा हजारांपेक्षा जास्त मते मिळविली होती. त्यामुळे एकेका मतासाठी झगडणाऱ्या प्रमुख उमेदवारांना मागच्या वेळी अपक्ष व इतर पक्षीय उमेदवारांनी चांगलेच अडचणीत आणले होते. 

सातव यांचा नवा चेहरा, राष्ट्रीय पातळीवर काम करताना विकासाची अपेक्षा, काँग्रेस नेतृत्वाशी असलेली जवळीकता अशा कारणांनी त्यांनी मतदारांवरही छाप पाडली होती. त्यामुळे मतविभाजन, इतर उमेदवारांनी घेतलेली ११ टक्के मते या सर्व बाबींवर मात करून त्यांनी विजयश्री खेचली होती.

44.46 टक्के मते सातवांना मागच्या लोकसभेला मोदी लाट असतानाही येथे काँग्रेसचे राजीव सातव यांनी काट्याची टक्कर दिली. काँग्रेसचे राजीव सातव यांना ४ लाख ६७ हजार ३९७ म्हणजे ४४.४६ टक्के तर शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांना ४ लाख ६५ हजार ७६५ म्हणजे ४४.३१ टक्के मते मिळाली होती. दोघांतील फरक अवघा १६३२ मतांचा होता.

25000 मते बसपाला १ लाख १८ हजार ३१५ मते उर्वरित २१ उमेदवारांनी घेतली होती. नंतरची सर्वाधिक बसपाचे चुन्नीलाल जाधव यांना २५ हजार १४५ म्हणजे २.३९ टक्के मते मिळाली होती. त्यानंतर माकपचे डी.बी.नाईक यांना १४ हजार ९८६ मते मिळाली. हे प्रमाण १.४३ टक्का होते.  बहुजन मुक्ती पार्टीचे उत्तमराव राठोड यांनी ९७७0 मते म्हणजे 0.९३ टक्का मते घेतली होती. इतर १८ उमेदवारांनी ६८ हजार १0१ म्हणजे ६.४८ टक्के मते मिळविली होती. 
 

Web Title: The difference between winning and defeating candidates in Hingoli is 0.16 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.