लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एखाद्या दुर्घटनेतील जळालेला रूग्ण जर जिल्हा रूग्णालयात दाखल झाला तर, या गंभीर रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत व त्यांचे प्राण वाचविता यावेत, यासाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा आवश्यक आहे. मात्र हिंगोली जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १ मध्येच अपुऱ्या जागेत जळित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणज उन्हाळ्यातसुद्धा जळित रूग्णांसाठी साधी कूलरचीही सुविधा नाही.जिल्हा रूग्णालयाच्या नवीन इमारत हस्तांतरणाची प्रक्रिया संथगतिने सुरू आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाºया रूग्णांचे सुविधेविना बेहाल होत आहेत. शिवाय कार्यरत डॉक्टर व परिचारिकांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र जळित वार्डाची स्थापन केली नाही. महिलांचा वार्ड क्रमांक १ मध्येच एका कोपºयात जळित कक्ष उभारण्यात आला आहे. अपुºया जागेत कक्ष असल्यामुळे उपचार करतानाही अडचणी निर्माण होतात. रूग्णालयात रात्रीच्यावेळी कर्तव्य पार पाडताना महिला कर्मचाºयांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. शिवाय परिचारिकांना नाहक त्रास दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रात्री-अपरात्री परिचारिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.निम्म्यांहून अधिक फॅन बंदच - रूग्णालयातील निम्म्याहून अधिक पंख बंद पडले आहेत. ऐन उन्हाळ्यात तरी हे पंखे सुरू करणे आवश्यक होते. तर काही ठिकाणच्या विद्युत उपकरणात किरकोळ बिघाड झालेले आहेत. याकडे मात्र वैद्यकीय अधिकारी व संबधित विभाग लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे रूग्णालयाचा कारभार दिवसेंदिवस ढेपाळत चालला आहे. शिवाय मागील चार दिवसांपासून रूग्णालयाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनही फुटली आहे.रूग्णालयातील वार्ड क्रमांक १ मध्ये जळित रूग्णांवर उपचार केले जातात. परंतु भर उन्हाळ्यातही या ठिकाणी साधी कुलरची व्यवस्था करण्यात आली नाही, हे विशेष. शिवाय येथील पंखाही बंदावस्थेत असल्याचे आढळून आले. त्यामुळे रूग्णांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत.जिल्हा रूग्णालयात विविध दुर्घटनेतील मागील चार महिन्यांत १९ जळीत रूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी एका बालकावर सध्या उपचार सुरू असल्याचे सोमवारी दिसून आले. यावेळी डॉक्टर उपचार करताना दिसत होते.जिल्हा रूग्णालयात रात्रीच्या वेळी कर्तव्य पार पाडताना महिला कर्मचाºयांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. शिवाय परिचारिकांना नाहक त्रास दिल्या जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जळित वॉर्डमधील रूग्णांचे बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:16 AM