सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:20 AM2018-11-20T00:20:40+5:302018-11-20T00:21:06+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात प्रत्येक वर्गात असंतोष खदखदत असून, त्याला मतपेटीत रूपांतरित करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे जनसंपर्क अभियान राबविले जात आहे. हे अभियान प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन खा.राजीव सातव यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात प्रत्येक वर्गात असंतोष खदखदत असून, त्याला मतपेटीत रूपांतरित करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे जनसंपर्क अभियान राबविले जात आहे. हे अभियान प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन खा.राजीव सातव यांनी केले.
काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात जनसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, झाँशीची राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केले. या बैठकीस जिल्हा पक्ष निरीक्षक दादासाहेब मुंडे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, जकी कुरेशी, सुरेशअप्पा सराफ, विनायक देशमुख, शंकरराव कºहाळे, बापुराव बांगर, धनंजय पाटील, मधु जामठीकर, रमेश जाधव, डॉ.क्यातमवार, शेख नेहाल आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खा.राजीव सातव पुढे म्हणाले की, देशभरात भाजपा सरकार विरोधात जनमत संघटित होत असल्याने दिवसेंदिवस काँग्रेसचे पाठबळ वाढत आहे. या काळात काँग्रेस पदाधिकाºयांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, आगामी काळात दुष्काळात जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असेही सातव म्हणाले. सूत्रसंचालन गोरख पानपट्टे यांनी केले.
कामाला लागा -मुंडे
लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाºयांनी, कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे. जिल्ह्यात प्रत्येक पदाधिकाºयांनी आपले लक्ष बुथभोवती केंद्रित करून बुथवर पक्षाचे मताधिक्य कसे वाढेल, यासाठी मोर्चेबांधणी करावी, असे आवाहन हिंगोली जिल्हा पक्ष निरीक्षक दादासाहेब मुंडे यांनी केले.