हिंगोली : नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने खरेदी केलेल्या मालाचे चुकारे मिळत नसल्याने मागील दोन-तीन महिन्यांपासून चिंताग्रस्त शेतक-यांसाठी शुभवर्तमान आहे. ज्यांनी आधी नोंदणी करून माल विक्री केंद्रावर दिला अशांचे चुकारे तत्काळ वाटप केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात उडीद, मूग, सोयाबीनच्या चुकाºयांचा प्रश्न गाजत आहे. अनेक शेतक-यांनी माल विकल्यानंतरही त्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत. हिंगोली येथील हमी भाव केंद्रावर झालेल्या अनियमिततेचा सरसकट सर्वच शेतक-यांना फटका बसत होता. यातही पणनच्या अधिकाºयांनी केलेल्या तपासणीत १0६६ शेतक-यांपैकी केवळ मोजकेच शेतकरी रक्कम अदा करण्यास पात्र ठरत होते. त्यामुळे तर पेच वाढण्याची भीती होती. त्यानंतर या गंभीर प्रश्नात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी लक्ष घातले. पणनच्या संचालक मेरीनिलिमा केरकट्टी यांच्याशी भंडारी यांनी चर्चा केली. त्यात ज्यांनी नोंदणी केली व ज्यांचा माल मोजणी करून वखार महामंडळाच्या गोदामात पोहोचला अशा सर्व शेतक-यांना चुकारे देण्यात यावे, असा मार्ग काढण्यात आला. तर नोंदणीच न केलेले जवळपास ३५0 शेतकरी आहेत. मात्र अशांचा माल मोजणी करून गोदामात पोहोचला असल्यास अशांनाही रक्कम मिळणार आहे.
जवळपास दीडशे शेतकरी असे नोंदणी न करता मोजणी झालेले मात्र मालही गोदामात न गेलेले निघण्याची शक्यता आहे. अशांच्या चुका-याचा प्रश्न निर्माण होवू शकतो.एकूण ३८१६ क्ंिवटल उडीद व १६१९ किलो मूग नाफेडने खरेदी केला होता. त्यातही जिल्ह्यात ज्या तालुक्याची सर्वाधिक उत्पादकता त्यानुसार खरेदीपर्यंत निकष शिथिल केला होता.तरीही हा प्रश्न पूर्णपणे सुटत नसल्याने भंडारी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शेवटी चुकारे वाटपाचा मार्ग मोकळा झाला.
चुका ग्राह्य धरल्याने दिलासाशेतक-यांना नोंदणी करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्यात चुका झाल्या. कर्मचाºयांनाही योग्य प्रशिक्षण नव्हते. त्यामुळे रीतसर खरेदी प्रक्रियेला सामोरे गेलेल्याही अनेक शेतकºयांचे नुकसान होवू शकते, ही बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे अशा काहींना पुन्हा नोंदणी केल्यानंतरच त्यांच्या मालाचा विचार होणार असल्याचेही सांगितले जात आहे. तूर्ततरी ज्यांची रीतसर विक्री त्यांचे चुकारे मिळणार आहेत.