याबाबत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिकुलाल बाहेती म्हणाले, पूर्वी तहसीलकडून मशिनवर ही माहिती अद्ययावत करून दिली जायची. यावेळी ते झाले नाही. शिवाय मका ही आली नाही. त्यामुळे अनेक गावातील वाटप झाले नाही. आज २५ तारीख आहे, ३० तारखेपर्यंत वाटप न केल्यास पुन्हा मशीन ते स्वीकारत नाही. प्रशासनाने ही अडचण सोडविली पाहिजे. आता कोरोनामुळे कडक नियम होत असून त्यापूर्वी वाटप झाले तर सोयीचे ठरेल.
याबाबत तहसीलदार पांडुरंग माचेवाड म्हणाले, दुकानदारांना या मशिनमध्ये माहिती अद्ययावत करून दिली जाते. काही तांत्रिक अडचणी असतील तर दुकानदारांनी त्या सोडवून घेतले पाहिजे. कोरोनाच्या काळात वाटपाला विलंब होता कामा नये. ज्या दुकानदारांना अडचणी आहेत, त्यांनी तहसील यांच्याशी संपर्क साधून अथवा एनआयसीमधून सोडवून घ्याव्यात.