लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप १० फेबु्रवारी रोजी करण्यात आले. आरोग्य विभाग, शिक्षण, महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबविण्यात आली.जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे माणिक स्मारक आर्य विद्यालयात विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटप केल्या. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. संतोष टारफे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, बालरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल कदम, ओमप्रकाश भारुका, प्रकाश थोरात, के. के. शिंदे आदी उपस्थित होते. जि. प. कन्या शाळेत राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, महिला व बालकल्याण अधिकारी वाघ, नरवाडे, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. राहुल गिते डॉ. जिल्हा शल्यचिकित्सक आकाश कुलकर्णी, डॉ. सतीश रुणवाल, डॉ. संदेश पोहरे, डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा साथरोग अधिकारी प्रशांत एस. तुपकरी, श्रीरामे, मोरे उपस्थित होते.जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी विविध अंगणवाडी केंद्रांच्या भेटी देऊन मोहिमेचा आढावा घेतला. काही अंगणवाडी केंद्रात जाऊन त्यांनी बालकांना जंतनाशक गोळी खाऊ घातली. यावेळी विस्तार अधिकारी अनिल केदार तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाभरात बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:24 AM