लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑ राज्य शिक्षक समितीच्या वतीने २१ आॅक्टोबर रोजी केमिस्ट भवन येथे गुरूगौरव पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय अधिवेशन उत्साहात पार पडले.कार्यक्रमास आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. संतोष टारफे, अॅड. शिवाजी माने, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, शिक्षण सभापती भैय्या देशमुख, ज्ञानोबा मुंडे, पं.स. सभापती, उत्तमराव असोले, गटशिक्षणाधिकारी सुभाष बगाटे, जाधव, संजय राठोड, अमोल जाधव, समितीचे राज्याध्यक्ष उदयजी शिंदे, काळू बोरसे पाटील, शिवाजी साखरे, पंडितराव नागरगोजे, विजय कोंबे, केंदू देशमाने, योगेश सावरकर, सिताराम लटपटे, प्रभाकर शिरसाठ, सतीष सावळे, ओम कोटकर आदी उपस्थित होते. यावेळी ६० शिक्षक ४ केंद्र प्रमुख, २ शिक्षण विस्तार अधिकारी, ५ उपक्रमशिल शाळांना गुरूगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विनायक भोसले, पी.एन. देशपांडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक समितीची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय राठोड, रफीक डोंगरगावकर, श्रीराम महाजन, शिवाजी अन्नमवार, गंगाधर टिप्परसे, दिलीप हराळ, जे.जे. राठोड, अंबादास डहाळे, बाळासाहेब चौरे, नरसिंग बिरेवार, परमेश्वर दिपके, खंडू मलके, लक्ष्मीबाई दहीफळे, अंबादास डहाळे, प्रदीप राठोड, शरद खिल्लारे यांच्यासह कार्यक्रम आयोजक समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
जिल्हास्तरीय अधिवेशन, गुरूगौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:36 PM