जिल्ह्यात मराठी व उर्दू माध्यमांच्या या रिक्त पदांचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
पदे भरली जातील
सध्या पदोन्नतीसाठी काम सुरू आहे. त्यानंतर शासनाकडून आंतरजिल्हा बदलीत ही पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे, तसेच नियमितपणे शासनाकडून सीईटी घेऊनही पदे भरली जातात. मात्र, पदोन्नतीची प्रक्रिया विविध कारणांनी झाली नसल्याने पदे रिक्त दिसत आहेत.
संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी
रिक्त पदे
मराठी शाळा १३३
उर्दू शाळा ५
कुठल्या विषयाची किती पदे रिक्त
विज्ञान ६४
भाषा ३८
सामाजिक शास्त्रे १६
माध्यमिकचे १२ शिक्षक अतिरिक्त असले तरीही २६ मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याने त्यांचा काही प्रश्न निर्माण झाला नाही. त्याजागी त्यांचे वेतन निघत आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान
गणित व विज्ञान या विषयासाठी प्राथमिकला एकच शिक्षक असतो. त्यामुळे हे पद रिक्त असले तरी इतर शिक्षकांना या दोन विषयांचा भार उचलावा लागतो.
काही ठिकाणी तर इतरही एखादे पद रिक्त असले की एकाच शिक्षकाला वर्गाचा पूर्ण भार पेलण्याची कसरत करावी लागते. यात नुकसान होते.
भाषा व सामाजिक शास्त्रासारख्या विषयांच्या शिक्षकांचीही पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांनी शिकायचे काय, हा प्रश्न आहे.
शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणतात...
पदोन्नती प्रक्रिया नसल्याने रिक्त पदे वाढली. त्यामुळे शिक्षकांवर दोन दोन वर्गांचा भार पडतो. अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. मुलांचे मोठे नुकसान होते. शाळेचे व्यवस्थापनही कोलमडते.
रामदास कावरखे,
जिल्हाध्यक्ष, म.रा.शि.सं.
शिक्षकांची रिक्त पदे असल्याने शाळेत तासिकांचे व्यवस्थापन बिघडते. काही शिक्षकांना अतिरिक्त वर्गांचा भार सोसावा लागतो. यात काही तास बुडण्याची भीती असते. त्यामुळे मुलांचे नुकसान होते.
गजान बोरकर,
जिल्हाध्यक्ष, पदवीधर शिक्षक संघटना