लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा नागनाथ नगरपंचायत हद्दीत नवीन देशी दारूचे दुकान, बियरबार व वाईनशॉपला शासनाने मंजुरी देऊ नये, या मागणीचे निवेदन २० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.औंढा नागनाथ हे धार्मिक ठिकाण असल्याने देशभरातून भाविक औंढा येथे येतात. ऐतिहासिक पर्यटनस्थळ असल्याने सर्व धर्मातील समाजबांधव एकत्र जमतात. त्यामुळे नवीन दारू दुकाने स्थलांतरित करण्यास परवाना देऊ नये, शिवाय स्थानिक प्रशासनास सुद्धा तसे निर्देेशित करून नवीन बार व शॉपी मंजूर करू नयेत, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्ककडे करण्यात आली आहे. औंढा नागनाथ येथे सर्वधर्मीय लोक एकत्रित राहतात. त्यामुळे निवेदनाद्वारे केलेल्या मागणीकडे प्रशासनाने लक्ष घालावे. तसेच यापुढे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबधित अधिकाºयांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी शेख निहाल तसेच मोठ्या संख्येने नागरिक निवेदन देण्यासाठी जिल्हा कचेरीवर जमले होते.
दारु दुकानास परवानगी देऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:07 AM