शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

वसमतमध्ये दुर्गंधीने बसवत नाही... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:56 AM

वसमत शहर हे उपजिल्हा ठिकाणासह शहर म्हणून कित्येक वर्षांपासून परिचित असून स्वच्छ भारत मिशन नुसार स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी शहरात शाळा-महाविद्यालयासह परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी बरोबरच विविध गल्लीबोळात कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रोगराई पसरण्याच्या भीतीने नागरिक हैराण असल्यानचे चित्र येथे पहायला मिळते.

ठळक मुद्देगल्ली बोळात कचऱ्याचे ढिगारे; आरोग्य बिघडण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत शहर हे उपजिल्हा ठिकाणासह शहर म्हणून कित्येक वर्षांपासून परिचित असून स्वच्छ भारत मिशन नुसार स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी शहरात शाळा-महाविद्यालयासह परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी बरोबरच विविध गल्लीबोळात कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रोगराई पसरण्याच्या भीतीने नागरिक हैराण असल्यानचे चित्र येथे पहायला मिळते.वसमत तालुका व उपजिल्हा ठिकाण मोठी बाजारपेठ, उत्पन्नाच्या, शिक्षणाच्या व आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी शहरात मात्र स्वच्छतेच्या नावाने ‘बोलाचीच कढी आन् बोलाचाच भात’! या म्हणी प्रमाने केवळ फलक, कचरा पेट्या, घंटा गाड्याच पहायला मिळतात. शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोरील पेट्रोल पंपाच्या बाजूस, बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या पूर्वेकडील गेटवर, वसमतशहरातील सार्वजनिक वाचनालयासमोर, भाजीमंडी परिसर, जवाहर बालक विद्यालयाच्या बाजूस, श्री योगानंद महाविद्यालय रस्त्याच्या बाजूसह महाविद्यालयाजवळच कच-याचे ढिगारे साचल्याने दुर्गंधीसह परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. भाजीपाला विक्रेते जून्या तहसीलसमोर कच-यातच बसतात;परंतु नागरिकांना नाईजाने माशा बसलेला भाजीपाला घ्यावा लागतो. उपजिल्हा रुग्णालय परिसरात,सार्वजनिक शौचालय गंगाप्रसाद अग्रवाल मार्केट परिसरासह स्त्री रूग्णालयाकडे जाण्याच्या मार्गातील परभणी रोडवरील दाद-याला लागूनच टाकाऊ मांस, चरबी, चारवट, पंख अशा स्वरूपातील अतिशय दुर्गंधी निर्माण करणारा कचरा वाटेत टाकला जातो. त्यामुळे येथे डुकरासह कुत्र्यांचा ऊत आल्यामुळे रूग्णासह, नातेवाईक, डॉक्टर, कर्मचा-यांना रूग्णालयात जाण्यासाठी त्रास होत आहे. अशा कच-यासह शहरातही गल्लोगल्ली देखील कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रोगराई व दुर्गंधी पसरण्याच्या भीतीने नागरिक चिंताग्रस्त आहेत. स्वच्छ भारत मिशन च्या नावाखाली शासनाने लाखो रुपये खर्च करूनही शहरात अस्वच्छता मात्र कायम आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी होऊन जागोजागी फलक व कचरा पेट्याच लावण्यात आल्या. लोकजागृती व प्रत्यक्ष कार्यवाही कागदावरच आहे की काय, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.---प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे...योगानंद स्वामी महाविद्यालयात जातांना देखील विद्यार्थी व महाविद्यालयीन कर्मचार्यांना नगरपालिकेच्या घंटागाडीकडून टाकल्या जाणा-या कच-यामुळे प्रचंड त्रास होतो. या कचरा ढिगा-याच्या बाजूलाच महाविद्यालय असल्याने कच-याच्या दुर्गंधीचाही त्रास होत असल्याने प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन शहरातील कचरा उचलण्यासह तो वस्ती, माणसांच्या वर्दळीपासून दूर टाकावा, अशी मागणी सामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPlastic banप्लॅस्टिक बंदी