शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

बंडखोर, गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांचे ऐकून घेऊ नका, असे म्हणणाऱ्यांचे कानशील लाल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 15:48 IST

चांडाळ चौकडीला बाजूला सारून मान-सन्मानाने बोलवा, विधानसभेवरील भगवा मानाने फडकत ठेवू

- विजय पाटीलहिंगोली : आम्ही शिवसेनेचे आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्या मनात आहेत. चांडाळ चौकडीला बाजूला सारून आम्हाला मान-सन्मानाने बोलवा. हा भगवा असाच विधानसभेवर फडकवत ठेवू, अशी साद कळमनुरीचे बंडखोर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी घातली. तसेच कोणी शिवसेनेचा बंडखोर, गद्दार म्हणून हिणवत असेल तर ऐकून घेणार नाही. त्यांचे कानशील लाल करा, असा इशारा देखील आ. बांगर यांनी यावेळी दिला. 

हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली. यावेळी ठाण्यातून नगरसेवक प्रसाद काळे, विशाल पावसे, राजेंद्र शिखरे, आ.संतोष बांगर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी बांगर म्हणाले, शिवसेनेचा बंडखोर, गद्दार म्हणून कोणी हिणवत असेल तर ते ऐकून घेणार नाही, असे म्हणणाऱ्यांचे कानशील लाल करा. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मी त्याला पाठिंबा देईल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होत असल्याने मी त्यांना पाठिंबा दिला. ते सामान्यांशी नाळ जुळालेले नेते आहेत. 

जे सोबत येतील त्यांना मुख्यमंत्री निवडून आणणारउद्धव ठाकरे यांची दिशाभूल करणारी लबाड मंडळी पक्ष मागे पडत आहे, हे कळू देत नव्हती. आता राज्यात शिवसेनेचा भगवा प्रत्येक ठिकाणी डौलाने फडकेल. जे सोबत येतील, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. येत्या ८ ऑगस्टला ते हिंगोलीत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर शिवसेना ही एकच असून कोणी बाहेर असेल तर त्यांच्यावर टीका करू नका. ते आपलेच आहेत, असेही बांगर म्हणाले. यावेळी राजेश्वर पतंगे, फकिरा मुंडे, विठ्ठल चौतमल, साहेबराव देशमुख, सुभाष बांगर, राम कदम, औंढा नगराध्यक्ष कपिल खंदारे, उत्तमराव शिंदे, रेखा देवकते, प्रताप काळे, सपना कनकुटे, जया देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाHingoliहिंगोलीEknath Shindeएकनाथ शिंदे