‘ज्वारी पिकात पाणी व्यवस्थापन करावे’
हिंगोली: रबी ज्वारी पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. रबी पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. उगवण झालेल्या रबी ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम १२.६ टक्के, ल्यामडा सायहालोथ्रीन ९.५ झेडसी ५ मिली किंवा स्पिनेटोरम ११.७ एसी ४ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पीक हे सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. वेळेवर पेरणी केलेल्या गव्हाला पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असे ‘वनामकृ’ विद्यापीठाने कळविले आहे.
‘केळीच्या घडांना झाकावे’
हिंगोली: केळी पीक फळ लागण्याच्या अवस्थेत असून केळी बागेत फळाची प्रत चांगली राहण्यासाठी केळीच्या घडांना झाकून ठेवावे.मृग बाग लागवड केलेल्या केळीच्या बागेत सीगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल १० मिली, स्टीकर प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे ‘वनामकृ’ विद्यापीठाने कळविले आहे.