रब्बी ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत
हिंगोली : रबी हंगामातील ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत आहे. उगवण झालेल्या रबी ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम १२.६ टक्के, ल्यामडा सायहालोथ्रीन ९.५, झेडसी ५ मिली किंवा स्पिनेटोस ११.७ एसी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे ‘वनामकृ’ विद्यापीठाने कळिवले आहे.
‘केळीच्या घडांना झाकून ठेवावे’
हिंगोली : केळी पीक फळ लागण्याच्या अवस्थेत असून, केळी बागेत फळाची प्रत चांगली राहण्यासाठी केळीच्या घडांना झाकून घ्यावे. मृग बाग लागवड केलेल्या केळीच्या बागेत सीगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाी प्रोपीकोनाझोल १० मिली, स्टीकर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा पीक मोहर लागण्याच्या अवस्थेत आहे. आंबा फळ बागेत रसशोषण करणाऱ्या कीडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के, १६ मिली किंवा थायमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी २ ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.