राज्यातील प्रकल्प पळविण्यासाठीच सत्ता स्थापनेचा द्रविडी प्राणायाम: बाळासाहेब थोरात
By शिवराज बिचेवार | Published: November 12, 2022 05:01 PM2022-11-12T17:01:29+5:302022-11-12T17:02:06+5:30
कोणी काही चांगली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की त्याला अडचणीत आले जात आहे
हिंगोली- गेल्या चार महिन्यात मोठे प्रकल्प इतर राज्यात जाण्याचे सत्र सुरू आहे, आजही एक प्रकल्प गेल्याची माहिती आहे. राज्यातील प्रकल्प पळविण्यासाठीच सत्ता स्थापनेचा द्रविडी प्राणायाम केला आहे, असा आरोप काँग्रेस चे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.
कळमनुरी येथे पत्र परिषदेत थोरात बोलत होते. आव्हाड यांच्याप्रमाणे अनेकांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. कोणी काही चांगली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की त्याला अडचणीत आले जात आहे, यापूर्वी असे कधी पाहिले नव्हते. म्हणूनच आम्ही लोकशाही धोक्यात आहे असे म्हणतोय. भारत जोडो यात्रेला सर्वच घटकांचा प्रतिसाद मिळत आहे. कळमनुरी तालुक्यात तर खास स्वागत झाले. तुळजापूर येथील महाद्वार ची प्रतिकृती तयार केली होती, गजराजने राहुल गांधी यांचे स्वागत केले. कोल्हापूर च्या कुस्तीगीर यांनी कुस्तीतील डावपेच सादर केले. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक उठसूट आरोप करीत सुटले आहेत. असेही ते म्हणाले.