हिंगोली : पंतप्रधान आवास योजनेच्या घरासाठी शहरातून नगर परिषदेने ११ प्रस्ताव पाठविले असून यापैकी ९ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. अजूनही दोन प्रस्ताव पेडींग असून त्याचा अहवालही शासनाकडे पाठविला आहे. यामुळे आता गरिबांनी झोपडीतच रहावे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जीवनात स्वत:चे घर असावे म्हणून पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून फाईल अनेकांनी फाईली पाठविली आहे. परंतु, निधी नसल्यामुळे अनेक घरे अर्धवट राहिली आहेत. २०१८ मध्ये १०९८ घरे मंजूर झाली. यापैकी ६०० घरे पूर्ण झाली. २०१९ मध्ये १२०६ घरांचा प्रस्ताव पाठविला होता. त्याची मंजुरी जानेवारी २०२१ मध्ये मिळाली आहे. परंतु, निधीअभावी सध्या घरांचे काम बंद आहे. नगर परिषदेमार्फत १२०६ जणांना बांधकाम परवानगी देणे सुरु आहे. कोरोनामुळे अनेकांचे घरांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. तसेच केंद्राकडून घराच्या बांधकामापोटी १२ कोटी ७८ लाख रुपये येणे बाकी आहे. एका लाभार्थ्याला राज्य शासनाचे १ लाख रुपये तर केंद्राकडून १ लाख ५० हजारांचे अनुदान दिले जाते. परंतु, ते वेळेवर मिळत नाही, अशी लाभार्थ्यार्ची तक्रार आहे.
प्रस्ताव पाठविले ११
मंजूर झाले ९
निधी नसल्यामुळे घरे राहिली अधुरी ४९८
केंद्राचे अनुदान ३ कोटी ६६ लाख ८० हजार
राज्याचे अनुदान १० कोटी ९८ लाख
आतापर्यंत वाटप झाले १४ कोटी ७० लाख
मंजूर झालेले घरकुल
२०१८-२०१९- १०९८
२०१९ -१२०६
२०२०-२०२१- ००
निधी नसल्यामुळे घर अर्धवट...
गरिबांना केंद्र व राज्याकडून घरांसाठी अनुदान दिले जाते. ही योजना नगर परिषदेमार्फत चालू आहे. परंतु, अनेक लाभार्थिना अजूनही निधी मिळाला नसल्यामुळे त्यांचे घरांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. घराचे स्वप्न कधी पूर्ण होईल? घरात कधी रहायला जावू? असे प्रश्न लाभार्थिना सतावत आहेत. न. प. ने फाईल पूर्ण केली. परंतु, निधी काही मिळत नाही. उसने पैसे घेऊन घर बांधावे लागत आहे.
प्रतिक्रिया....
शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २०१८-२०१९ मध्ये १०९८ घरांना मंजुरी मिळाली आहे. आतापर्यत शहरात ६०० घरे पूर्ण झाली आहेत. कोरोना काळापासून आजपर्यत केंद्राकडून निधी न मिळाल्यामुळे शहरातील जवळपास ४९८ घरांचे बांधकाम थांबले आहे.
-डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी
फाईल पूर्ण आहे, परंतु अनुदान मिळेना...
घरासाठी फाईल पाठविली आहे. ती मंजूरही झाली आहे. परंतु, अजूनही पैसे काही पदरात पडले नाही. घर बांधकामासाठी पैसे उसने घेतले आहेत. अनुदान कधी मिळते याची वाट पाहत आहे.
- विजय महाशब्दे, लाभार्थी
फाईल मंजूर झाली आहे. निधी नसल्यामुळे घराचे बांधकाम अपूर्ण राहिले आहे. पक्क्या घरात कधी जावू याचा नेमही नाही. शासनाने निधी लवकर दिल्यास घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. निधी कधी मिळतो हे समजायला मार्ग नाही. आजतरी बांधकाम बंदच आहे.
- भवन चौधरी, लाभार्थी