लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील नगर पालिकेमध्ये शनिवारी होणारी सभा विधान परिषदेच्या आदर्श आचार संहितेमुळे तहकूब झाली. त्यामुळे तब्बल २४ कोटी रुपयांच्या निधीतून शहराच्या विकासात भर टाकणारी कामे आता एक महिना लांबणीवर गेली आहेत. तर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले फलकही पालिकेच्यावतीने हटविले आहेत.परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये हिंगोलीसह राज्यातील ६ विधान परिषदेच्या सदस्यांची निवडणूक जाहीर केली. त्यामुळे या निवडणुकीची आचार संहिता २१ एप्रिल पासूल लागू करण्यात आली आहे. या निवडणूक प्रक्रियेमुळे शनिवारी होणारी पालिकेची सभा तहकूब करण्यात आल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले. सभेस नगराध्यक्ष व सन्माननीय नगरसेवकांची उपस्थिती होती. सभेमध्ये २५ कोटी रुपयाच्या निधीतून शहरात करण्यात येणाऱ्या कामांचे ठराव मान्य केले जाणार होते. शिवाय, शहरातील विविध विकास कामावरही नगरसेवक चर्चा करणार होते. यासाठी सर्वच नगरसेवक तयारीत असताना अचानक आचारसंहिता लागू झाल्याचे माहित होताच सर्वच प्रश्न अनुत्तरित राहिले. आता आचारसंहिता संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. आदर्श आचार संहिता लागू झाल्यामुळे शहरातील काना कोपºयातील विविध पक्षांचे झेंडे, पोस्टर बॅनर हटविण्यात आले. तर शहरातील सिद्धार्थ नगर येथे बॅनर हटविण्यावरुन काही काळ वाद झाला होता. मात्र घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाल्याने पुढील वाद टळला. शहरातील बॅनर काढण्यासाठी आता पालिका सज्ज झाली असून, आचारसंहितेच्या काळात एकही बॅनर दिसणार नाही. तर या कालावधीत कोणी बॅनर लावण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सीओ पाटील यांनी सांगितले.पालिकेच्या सभेची नागरिकांसह नगरसेवकांना प्रतीक्षा लागली होती. ती वेळ आलीही होती मात्र अचानक लागलेल्या आचार संहितेमुळे अनेक विषय जसेच्या तसेच राहिले. विशेष करुन कोट्यवधी रुपयाचा निधीचे जराही नियोजन लागले नसल्याने आता नियोजनासाठी नगरसेवकांसह नागरिका-चे पुढील सभेकडे लक्ष लागले आहे. मतमोजणी झाल्यानंतरच पालिकेच्या सभेचे नियोजन लागणार आहे. तर जिल्हा दौºयावर भूमिपूजनासाठी येणारे पालकमंत्री दिलीप कांबळे यांचाही दौरा आचारसंहितेमुळे रद्द होण्याची चिन्हे आहेत.शनिवारी होणाºया पालिकेच्या सभेमध्ये अनेक मुद्दे गाजणार असल्याचा गाजावाजा झाला होता. त्यामुळे अनेक जण या सभेसाठी आवर्जून उपस्थित होते. मात्र त्यांचीही निराशा झाली.
आचारसंहितेमुळे न.प.ची सभा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:38 AM