लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : कयाधू नदीपात्रात खोदलेल्या विहिरीत पडून वसई येथील एका शेतकºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २२ डिसेंबरच्या रात्री घडली.वसई येथील शेतकरी बालाजी नामदेवराव साळवे (३०) हे रविवारी शेतात गेले कयाधू नदीपात्रात खोदलेल्या विहिरीत पाईप सोडत असता विहिरीत पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. २३ डिसेंबर रोजी सकाळी बालाजी साळवे घरी परत न आल्याने कुटुंबातील नातेवाईकांनी शेताकडे धाव घेतली असता त्यांचा मृत्तदेह नदीपात्रातील विहिरीत आढळून आला.घटनास्थळी फौजदार शिवसांब घेवार, पी.एम. चाटसे, रोहिदास राठोड, नामदेव जाधव, ज्ञानोबा थिटे यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला व पंचनामा करून शवविच्छेदनासाठी हिंगोलीच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.
नदीपात्रातील विहिरीत बुडून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:18 AM