सेनगाव (हिंगोली ) : सतत विजेच्या जाण्या येण्याने त्रासलेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले. येथील उपविभागीय विजवितरण कंपनीच्या कार्यालयात त्यांनी निद्रा आंदोलन केले. या वेळी शिवसैनिकांनी दुपारपर्यंत कार्यालयात निद्रा घेतली.
तालुक्यात विज वितरण कंपनीच्या वतीने मान्सून पुर्व दुरुस्ती चे काम हाती घेतले नसल्याने तालुक्यात मागील आठ दिवसापासून विज वितरण सेवेचा बोजवारा उडाला आहे.दररोज तब्बल दहा तासाहून अधिक काळ विज पुरवठा तालुक्यात खंडित राहत असल्याने तालुक्यातील जनतेची विज कंपनीने झोप उडवली आहे.सर्व सामान्य नागरीक चागलेच हैराण झाले आहेत.या विरोधात शिवसेनेचा वतीने बुधवार ला आक्रमक भूमिका स्वीकारत अनोखे आंदोलन करण्यात आले.सर्वसामान्याची झोप उडवीणारा विज कंपनीच्या कार्यालयात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निद्रा आदोंलन करण्यात आले.या आदोलनात शिवसैनिकांनी कंपनीच्या कार्यालयात काही तास निद्रा केली. या प्रकाराने विज कंपनीच्या कार्यालयाची चागलीच खळबळ उडाली.
या आदोलनाची दखल घेत कार्यकारी अभियंता जाधव यांनी आदोंलन कर्ताशी चर्चा करीत पाच दिवसात तालुक्यातील तांत्रिक बिघाड, कोसळेला विधुत खांबाची दुरुस्ती करुण सुरळीत विज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.या आदोंलनात उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख शैलेश तोष्णीवाल, शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, मंगेश पवार, प्रवीण महाजन,निखिल देशमुख,दिलीप कुंदरगे,संतोष पाटील,जगणं पाटील,गजानन देशमुख,वैभव देशमुख, अनिल गीते,आकाश जाधव ,अमजद पठाण सह अन्य शिवसैनिक सहभागी झाले होते.