शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप, उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव
5
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
6
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
7
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
8
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
9
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
10
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
11
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
12
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
13
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
14
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
15
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
17
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
18
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
19
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना

बाजार समितीच्या सभापतींवरील अविश्वास ठरावामुळे वसमतमध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 5:59 PM

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापतींवर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाने शनिवारी हिंसक वळण घेतले. अविश्वासावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीपूर्वी शनिवारी सकाळी प्रचंड राडा झाला.

वसमत, दि. 5 - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापतींवर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाने शनिवारी हिंसक वळण घेतले. अविश्वासावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीपूर्वी शनिवारी सकाळी प्रचंड राडा झाला. नवघरेच्या समर्थनार्थ हजारो तरूण व शेतकरी रस्त्यावर उतरले होते. या जमावाने सभेसाठी येणा-या संचालकांच्या वाहनांच्या ताफ्यावर प्रचंड दगडफेक केली. यात आठ जण जखमी झाले असून, अनेक वाहनांचे नुकसान झाले. तणावाच्या वातावरणात अविश्वास ठराव पारित झाला. वसमत बाजार समितीचे सभापती राजू पाटील नवघरे व उपसभापती तानाजी पाटील बेंडे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. त्यावर चर्चेसाठी आज सभा झाली. ठराव दाखल झाल्यापासून राजू नवघरे यांचे समर्थक नाराज होते. सामान्य कुटुंबातील नेत्यावरील प्रस्थापितांकडून आलेल्या अविश्वासाच्या विरोधात प्रचंड सहानुभूतीची लाट तयार झाली होती. शनिवारी सहलीवर गेलेले संचालक सभेसाठी परत आले. तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर प्रचंड संख्येने जमाव जमला होता. संचालकांना बैठकीला जावू द्यायचे नाही, असा निर्धार नवघरे समर्थकांचा होता. त्यानुसार नांदेडमार्गे वसमतकडे येणाºया संचालकांच्या वाहनांना माळवटा परिसरात नवघरे समर्थक तरूणांच्या जमावाने आडवले. प्रचंड दगडफेक केली. काही संचालकांना जबर मारहाणही झाली. जीव वाचवण्यासाठी अनेकजण शेतात लपून बसले. संचालकांच्या सोबत असलेल्या वाहनांवरही हल्ला झाला. यात आठ जण जबर जखमी झाले आहेत. वाहनांवर तुफान दगडफेक झाल्याने वाहनांच्या काचांचा चुराडा झाला. सहा गाड्यांचे नुकसान झाले. एक जीप तर दगडफेकीतून वाचवण्याच्या नादात रस्त्याच्या खाली घसरली. सुदैवाने मातीत फसल्याने उलटली नाही, नसता मोठी दुर्घटना झाली असती. बैठकीच्या पार्श्चभूमीवर राडा होणार असल्याची शक्यता गृहीत धरून तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. दगडफेकीच्या स्थळावर तातडीने पोलीस पोहोचल्याने संचालकांना सहीसलामत जमावाच्या तावडीतून सोडवून सभेस्थळी आणण्यात आले. जमलेल्या तरूण व शेतकºयांचा संताप पाहता काही संचालकांनी तर पोलिसांच्या गाडीतच बसून सभेसाठी येण्यात धन्यता मानली. यावरून जमावाच्या दहशतीची व तणावाची तीव्रता लक्षात येते. शून्य विरुद्ध १३ मतांनी अविश्वास पारितअविश्वास दाखल केलेले १३ पैकी १३ संचालक सभागृहात हजर झाले. सभापती, उपसभापती व अन्य तिघे गरैहजर राहीले. त्यामुळे १३ विरूद्ध शून्य मताने अविश्वास ठराव पास झाला. पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार उमाकांत पारधी यांची उपस्थिती होती.सहा जण जखमीजखमी होणाºयांमध्ये प्रभाकर इंगोले, अक्षय दळवी, विनोद इंगोले, नितीन दळवी, नारायण लोकेवार, रामू धूत आदींचा समावेश आहे. जखमींवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. राड्यात जखमी होणाºयात रामू धूत या व्यापाºयांचा समावेश आहे. त्यांचा राजकारणाशी संबंध नसतानाही त्यांच्यावर हल्ला झाल्याची चर्चा आहे. दवाखान्यात उपचार घेणाºया तरूणांनीही आम्ही केळीची पट्टी आणण्यासाठी जात असताना हल्ला झाल्याचे सांगितले.वादळ अजूनही शांत नाहीया प्रकाराने वसमत तालुका ढवळून निघाला आहे. अविश्वास ठराव पास झाला असला तरी राजू पाटील नवघरे हा तालुक्यातील सर्व सामान्यांचा कार्यकर्ता असल्याच्या घटनेवरही आज शिक्कामोर्तब झाले. कार्यकर्ताविरूद्ध सर्व प्रस्थापित लढाई असे स्वरूप या अविश्वास ठरावाला आले होते. अविश्वास ठराव पास झाला असला तरी या निमित्ताने उठलेले वादळी अद्यापही शांत झालेले नाही. भविष्यात प्रचंड उलथापालथ घडवून आणण्यास हा अविश्वास कारणीभूत ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटाउद्भवलेली परिस्थिती पोलिसांनी कुशलतेने हाताळली. सभापती राजू पाटील नवघरे यांनी संतप्त तरूणांना शांत केल्यानेच जास्त उद्रेक झाला नाही. डीवायएसपी शशिकिराण काशीद, पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांच्यासह हट्टा, कुरूंदा, बाळापूर, वसमत, वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी एसआरपीची तुकडी असा मोठा फौजफाटा तैनात होता.  अविश्वास प्रस्ताव पास झाला असला तरी सामान्य शेतकरी व तरूणांच्या मनातील विश्वास मी जिंकला आहे. मला सभापती पदावरून हटले तरी सामान्यांच्या मनातून मला कोणी हटवू शकणार नाही. शेतकºयांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी बाहेरचे खरेदीदार मी वसमतला आणले. त्यातून काही जणांचे आर्थिक नुकसान झाले. त्यांनीच हा प्रकार घडवला असल्याची प्रतिक्रिया राजू पाटील नवघरे यांनी दिली. 

बाजार समितीमध्ये शेतक-यांना सुविधा मिळाव्यात शेतीमालाला भाव मिळावा, अशी आमची मागणी होती. संचालकांना विश्वासात न घेता सभापती कारभार करत होते. त्यातून सर्व संचालकांनी एकत्र येवून हा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच विकास झाला पाहिजे व सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, यासाठी सर्व संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला व एकजुटीने पास केल्याची प्रतिक्रिया सभापतीपदाचे प्रमुख दावेदार राजेश पाटील इंगोले यांनी दिली.