लहान मुलांची आबाळ
या निवडणुकीत तरुणाई ग्रामपंचायतच्या मैदानात उतरण्यास उत्सुक असल्याचे चित्र बऱ्याच प्रमाणात दिसत आहे. त्यातच महिला आरक्षणामुळे लहान मुलांना सोबत घेऊन आलेल्या माता -भगिनींना मुले सांभाळताना मोठी कवायत करावी लागत होती. काही ठिकाणी पेंगत असलेल्या लहान मुलांना घेऊन बसलेल्या महिला दिसत होत्या. त्यातच तहान, भूक लागली की, हॉटेलचा रस्ता धरावा लागत होत्या. अनेक दिवसांनंतर हॉटेलचालकांचाही चांगला व्यवसााय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आजपासून ऑफलाइन
आता ऑनलाइन अर्ज भरण्याची गरज नाही. ३० व ३१ डिसेंबर रोजी ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. शिवाय ३१ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. जात पडताळणीसाठीही हाच नियम लागू केला आहे. त्यामुळे ग्रा.पं. इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.
बॅंक खात्यासाठी अट शिथिल
ग्रा.पं. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीयीकृत, शेड्यूल्ड अथवा सहकारी बॅकेत स्वतंत्र खाते उघडून त्यातून खर्च करण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश होता. त्यात आता शिथिलता दिली असून यापूर्वी जाहीर केलेल्या निवडणुका स्थगित केल्यामुळे तेव्हा काढलेले खाते निवडणूक खर्चासाठी ग्राह्य धरण्यास सांगण्यात आले आहे.