मुंबई येथून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री अब्द्दुल सत्तार, सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंढे, ग्रामविकास सचिव महेश कुमार, संचालक राजाराम दिघे, तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यांतील घरकुल लाभार्थ्यांचे अभिनंदन करून प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना घरकुलाची चावी प्रदान केली. हिंगोलीतील कैलास रामचंद्र वसू, रा. वडद, विनोद कुंडलिक सोनवणे, रा. इंचा व सागराबाई नारायण गायकवाड, रा.बळसोंड या तीन लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात ई गृहप्रवेश व सत्कार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा, तसेच प्रकल्प संचालक धनवंत माळी यांच्या हस्ते करण्यात आला. हिंगोली येथून या कार्यक्रमास घरकुलाचे कर्मचारी जिल्हा प्रोग्रामर गणेश पाटील, सचिन इंगोले, फराहनोद्दिन सय्यद, संतोष काळे, ग्रामीण अभियंता देवकर, समीर व गायकवाड हे उपस्थित होते.
"सर्व घरकुल लाभधारकांनी आवर्जून घरकुल परिसरात वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे, तसेच मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून कोरोनापासून आपले गाव मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा"- रुचेश जयवंशी (जिल्हाधिकारी हिंगोली)