लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम पद्धतीने शेतमाल खरेदी करण्यासाठी पणन महामंडळाने बाजार समितीला ४० लाखांचे साहित्य दिले आहे. मात्र अद्याप एकदाही ई-नाम पद्धतीने लिलाव न झाल्याने हे साहित्य धूळ खात पडून आहे. आता तर ई-नामचा बाजार समितीच्या पदाधिकारी व प्रशासनास विसर पडल्याचे दिसते.ई-नाम पद्धतीने शेतमाल खरेदी करण्यास बाजार समितीचे अधिकारी व पदाधिकारी कमी पडत आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने वारंवार निर्देश देऊनही व्यापारी खरेदीस तयार नसल्याचे कारण बाजार समितीचे पदाधिकारी जिल्हा उपनिबंधकांना सांगतात. ई-नाम सुरु करण्यासाठी आतापर्यंत चार ते पाच बैठका झाल्या मात्र कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने या सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. पणन महामंडळाने ई-नाम पद्धतीने शेतमाल खरेदी करण्यासाठी ४० लाखांचे साहित्य बाजार समितीला दिले आहे. त्यामध्ये १० संगणक, ४ यूपीएस, १ एलईडी टीव्ही, २ लेझर प्रिंटर, २ टॅब, ३ लिलावगृह यासह शेतमाल परीक्षण प्रयोगशाळा देण्यात आली. तसेच अडते व व्यापाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. मात्र ई-नाम पद्धतीने एकदाही खरेदी न केल्याने हे साहित्य धूळ खात पडून आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज चार ते पाच हजार क्विंटल हळदीची आवक होते. मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी येथे हळद घेऊन येतात. यातून बाजार समितीला दररोज तीस ते चाळीस हजारांचे उत्पन्न मिळते. ई-नाम पद्धतीने शेतमाल खरेदी सुरु केल्यास बाजार समितीचे उत्पन्न वाढणार असून शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. मात्र ई-नाम पद्धतीने शेतमाल खरेदी सुरु झाल्यास व्यापाºयांना मनमानी पद्धतीने भाव ठरविता येणार नाही. या भीतीपोटी व्यापाºयांतून बाजार समितीवर दबाव आणला जात आहे. त्यामुळे पदाधिकारी कोणताही निर्णय घेत नाहीत.व्यापाºयांना व्यवसाय करण्यासाठी बाजार समितीने परवाना दिलेला आहे. व्यापाºयांनी नियमांचे पालन न केल्यास तो परवाना रद्द करण्याचा अधिकार बाजार समितीला असतो, त्यामुळे त्यांना हे अशक्यप्राय नाही, असे उपनिबंधक कार्यालयातीलच एका अधिकाºयांनी सांगितले.
कृउबात ई-नामचे ४० लाखांचे साहित्य धूळ खात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:46 PM