औंढा नागनाथ: तालुक्यातील पिंपळदरी येळेगाव सोळंके या परिसरातील गावामध्ये सकाळी आठ वाजून 34 मिनिटांनी जमीन हादरली असल्याची माहिती समोर आली असून या हल्ल्यामुळे परिसरातील पंधरा गावातील लोक पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडले आहेत. सतत होणारे आवाज जमिनीला बसणारे धक्के यामुळे नागरिक हैराण झाले असून प्रशासनाने याचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली जात आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी ,नांदापूर आमदरी, पूर, सोनवाडी ,जामगव्हाण या गावात नेहमीच जमिनीमधून गुड भूकंप सारखे कंपन होऊन आवाज होऊन जमीन हादरत असल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत यावेळेस मात्र नव्याने या गुड आवाज भूकंप सदृश्य धक्के येळेगाव सोळुंके ,फुल दाबा सुरवाडी या नवीन गावांना जाणवला आहे.
रविवारी सकाळी आठ वाजून 34 मिनिटांनी जमीन हादरून गुड आवाज आल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. सदर भूकंपाच्या सदरील कंपनी अधिक काळ असल्याने नागरिकांनी घराच्या बाहेर पळ काढला. यांच्या घरावरील तीन पत्रे जमीन हरल्याने खिळखिळी झाली आहेत ही बाब नित्याचीच झाली असून याचा शोध लावण्याची मागणी वारंवार या भागातील नागरिक प्रशासनाकडे करीत आहेत. यावेळेस धक्का मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती समोर येत आहे.