शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
4
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
5
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
6
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
7
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
8
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
9
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
10
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
11
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
12
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
13
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
14
महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!
15
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
16
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
17
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
19
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
20
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का; ३.५ रिश्टर स्केलची नोंद!  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 8:25 AM

या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

- इस्माईल जहागिरदार 

वसमत (जि. हिंगोली): जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी व औंढा या तीन तालुक्यांतील अनेक गावांत २० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजून ९ मिनिटाला भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

वसमत तालुक्यातील पांगरा ( शिंदे) येथे २० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजून ९ मिनिटांनी भूगर्भातून आवाज झाला. यावेळी लोक खडबडून जागे झाले आणि रस्त्यावर आले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने या घटनेला दुजोरा दिला आहे. यापूर्वी ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२:०४ वाजेदरम्यान भुगर्भातून मोठा आवाज आला होता. यावेळीही लोक रस्त्यावर येत रात्र जागून काढली होती.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे भूकंपाचे केंद्र सांगितले जात आहे. वसमत तालुक्यासह कळमनुरी व औंढा येथेही भूकंपाचा धक्का जाणवला आहे. गत ६ वर्षापासून जमिनीतून  आवाज येत भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १५ जुलै रोजी ७:०५  व ७:१५ वाजेदरम्यान असे दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते.

टॅग्स :EarthquakeभूकंपHingoliहिंगोली