लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : घरात कोणी नसल्याचे पाहून झोपेत असलेल्या आठ वर्षांच्या मुलीला बाहेर नेऊन एकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना औंढा तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे २९ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली.ब्राम्हणवाडा येथे आरोपी अंकुश सखाराम बोडखे याने घरामध्ये म्हातारी आजीजवळ मुलगी झोपलेली असताना उचलून बाहेर स्वत:चे घरी आणले. त्या ठिकाणी मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीला जाग आल्यावर आरडाओरड केल्याने जवळ असलेले एकाने धाव घेऊन सदरील मुलीची सुटका केली. या प्रकरणात औंढा पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास पोनि कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सविता सपकाळे करीत आहे. मुलीच्या आजोबांनी याबाबत फिर्याद दिली असून येथील ग्रामीण रूग्णालयात मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
आठ वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:26 AM