हिंगोली: डिजिटल इंडियाच्या मोहिमेस वीज ग्राहक दिवसेंदिवस प्रतिसाद देत आहेत. हिंगोली जिल्ह्यात २.३0 कोटी रुपये आॅनलाईन भरले आहेत.ग्राहकाभिमुख सेवा देण्याच्या भूमिकेतून आॅनलाईन बिलीेगचे विविध पर्याय महावितरणने उपलब्ध करुन दिलेले आहेत. ग्राहकांचा वेळ व पैसा वाचविण्याच्या दृष्टीने इंटरनेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्डव्दारे तर मोबाईल अॅपच्या माध्यमातून वीज ग्राहकांना वीजबील भरण्यासाठी सोपे व सुलभ असलेले पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. ग्राहकही आॅनलाईन बील भरण्यास पसंती देत असून दिवसेंदिवस वापर वाढतच आहे. हिंगोली मंडळातील ७६३५ ग्राहकांनी २ कोटी ३0 लाखांचा आॅनलाईन भरणा केला आहे.
वीज ग्राहकांनी आॅनलाईन भरले २.३0 कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:44 PM