लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील न.प.चे मुख्याधिकाºयांना रमाई आवास घरकुल यादी जाहीर करण्याच्या कारणावरून २६ डिसेंबर रोजी नगरसेवकाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या घटनेच्यसा निषेधार्थ गुरुवारी कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन केले. त्यानंतर नगराध्यक्षा सविता चोंढेकर, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना निवेदन दिले.मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना कार्यालयीन कामकाज करत असताना काँग्रेसचे नगरसेवक सुमेध मुळे यांनी कार्यालयात येऊन रमाई आवास घरकुल संदर्भात मला विचारणा न करता निवड यादी बोर्डवर का प्रसिद्ध केली. या कारणावरुन मुख्याधिकाºयांना शिवीगाळ व धकाबुकी केली. घटनेच्या निषेधार्थ न.पं. च्या कर्मचाºयांनी २७ डिसेंबर रोजी काम बंद आंदोलन केले. सदरील घटनेची जिल्हाधिकाºयांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी कर्मचारी संघटनेने केली. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष विजय महामुने, उपाध्यक्ष विष्णू रणखांबे, जिल्हाउपाध्यक्ष उत्तम जाधव, अनिल नागरे, प्रकाश तोटालू, अविनाश चव्हाण, नंदकिशोर डाखोरे, उत्तम गवळी, मंजुषा राठोड, राधा काळे, नागेश बुरकुले, सतीश रणखांबे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.याबाबत नगरसेवक सुमेध मुळे यांना विचारले असता ते म्हणाले नगरपंचयतच्या वतीने रमाई घरकुलची यादी सर्वांच्या सहमतीने दिली होती. परंतु ८७ लाभार्थ्यांची यादी मुख्याधिकाºयांनी स्वत: सही करून पाठविली. मला विश्वासात घेतले नाही. उलट त्यांनी चुकीची माहिती पाठविली. म्हणून गरीब लोकांचे नावे यादीत का घेतली नाही. यासंबंधी जाब विचारण्यासाठी गेलो होतो. त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली नाही. असे त्यांनी सांगितले. तर नगराध्यक्षा चोंढेकर म्हणाल्या की, रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत १२४ लाभार्थ्यांचे प्रस्थाव प्राप्त आहेत. असे वाद उद्भवू नयेत म्हणून सर्वच प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे मजुंरीसाठी पाठविणार असल्याचे नगराध्यक्षा चोंढेकर यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:05 AM