निवेदनात म्हटले की, शासनाची, महसूल प्रशासनाची अथवा ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता, साळवा येथील एक जण गट क्रमांक २६६ मधील जिल्हा परिषद शाळेच्या १ हेक्टर २१ आर जमिनीवर अनधिकृतरीत्या नांगरणी करून तार कुंपण करीत आहे, तसेच जमिनीचा ताबा असल्याचे सांगत आहे. शाळेच्या मालकी हक्काच्या जमिनीवर ताबा व अतिक्रमण होऊ नये, यासाठी गावकऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समितीकडे विनंती केली होती. मात्र, शाळा समितीने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप करीत शाळेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवून शेतजमीन सातबाराप्रमाणे कायम करावी, तसेच भविष्यात अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणीही निवेदनात गावकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर सरपंच गोकर्णा करंडे, उपसरपंच देविदास ढेपे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुण कदम, चेअरमन नागोराव करंडे, पोलीस पाटील बळीराम बाभुळकर, ग्रा.पं. सदस्या सुषमा माखणे, पुष्पांजली पाईकराव, मंदाताई करंडे, ग्यानोजी माखणे, देविदास औटे, पांडुरंग मीटकर, वनीताताई औटे, शिवाजी करंडे, शंकर गावंडे, नथू करंडे, गजानन करंडे, प्रकाश करंडे, मारोतराव करंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जिल्हा परिषद शाळेच्या जमिनीवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:39 AM