लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा वर्धापनदिनानिमत्त १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे कयाधू नदी पुन:रूजीवन चळवळ व ग्रामस्तरीय भूजल संवाद या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यकार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक सी. डी. चव्हाण, सरपंच सुवर्णमाला गव्हाणे, कनिष्ठ भूवैज्ञानिक पी. पी. घडेकर, डॉ. नाकाडे, उगमचे जयाजी पाईकराव, डॉ. किशन लखमावार, प्रा. भगवान गुठ्ठे, डॉ. के. बी. देशपांडे, जलनायक जि. प. सदस्य डॉ. सतिश पाचपुते, डॉ. अवधूत शिंदे, डॉ. पुंजाजी गाडे, प्रा. सुरेश धूत आदी उपस्थित होते. कयाधू नदी पुन:रूजीवन चळवळीत जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी होण्याच्या व ग्रामस्तरीय भूजल संवादतून जनजागृतीसाठी हा कार्यक्रम सोडेगाव येथे ठेवण्यात आला होता. कयाधू पुन:रूजीवितसाठी काढण्यात आलेल्या जलदिंडीचा याच गावात समारोप झाला. यात सोडेगाव येथील ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता. नदी पुनरूजीवितसाठी अधिक जनजागृती होऊन लोकचळवळ उभी राहावी या दृष्टिकोणातून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी मार्गदर्शन केले. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे अपूरे मनुष्यबळ असूनही, कामे मात्र यंत्रनेने पूर्ण केली आहेत, असे ते म्हणाले. पाणी टंचाईबाबतही यंत्रणा नेहमी सक्रीय असून कयाधू पुन:रूजिवीतसाठी यंत्रणेचे मार्गदर्शनासाठी मोठा हातभार असल्याचे तुम्मोड यांनी यावेळी सांगितले.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाकार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी वरिष्ठ भूवैज्ञानिक सी.डी.चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा १९७१ ते आजपर्यंतचा इतिहास यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले हे कार्यालय शासनाच्या कृषि विभागातून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागाची स्थापना व सुरूवातीला शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे खोलीकरण करणे, भूजलाचे विस्तृत सर्वेक्षण आणि विकास करणे. तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई हाताळणे, विंधन विहिर कार्यक्रम, स्त्रौत बळकटीकरणासाठी पारंपारी, अपारंपारिक उपाय-योजना राबविणे आदी कामांची माहिती यावेळी चव्हाण यांनी दिली. कार्यक्रमात जलनायकांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी ध. ना. कांकरीया, भिमराव शेळके, पी. पी. घडेकर, सिद्धार्थ रणवीर तसेच सोडेगाव शाळेतील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले. जलनायकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या वर्धापन दिनी कयाधूवर जनजागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:03 AM