युवक काँगे्रसतर्फे निबंध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:16 AM2018-10-15T00:16:20+5:302018-10-15T00:17:07+5:30

जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनमित्त १४ आॅक्टोबर रोजी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी या दोन गटांत ‘गांधीजी मला भेटले, गांधीजी मला समजले’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.

 Essay Competition by Youth Congress | युवक काँगे्रसतर्फे निबंध स्पर्धा

युवक काँगे्रसतर्फे निबंध स्पर्धा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनमित्त १४ आॅक्टोबर रोजी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी या दोन गटांत ‘गांधीजी मला भेटले, गांधीजी मला समजले’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे आयोजित स्पर्धेचे उदघाटन आ. डॉ. संतोष टारफे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी पवार उपस्थित होते. आयोजित स्पर्धेत विविध शाळेतील जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक ३ हजार रूपये, द्वितीय २ हजार, तृतीय १ हजार रूपये तसेच सन्मान चिन्ह, ५ प्रोत्साहनपर पारितोषीक व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र जिल्हा युवक काँग्रेसतर्फे दिले जाणार आहे. यशस्वीतेसाठी प्रा. गुलाब भोयर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेख कलीम, मयूर राठोड, शेख हानिफ, नितीन कदम, शेख ऐजाज, पप्पू व्यवहारे, शेख शहबाज, विजय हाके, इम्रान पठाण, झनक जाधव, प्रफुल्ल राठोड, प्रभाकर कदम, संजय साहू, आदींनी परिश्रम घेतले.

Web Title:  Essay Competition by Youth Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.