हिंगोली: कोरोना काळात गरीब व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. या उपक्रमास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काहींच्या नशिबी मात्र शिवभोजन थाळीही राहत नाही, अशी प्रतिक्रिया लाभार्थींनी दिली. दुसरीकडे शिवभोजन थाळी वाढवून द्यावी, अशी मागणीही केंद्र चालकांनी शासनाकडे केली आहे.
गिबांना रोजच्या रोज अन्न मिळावे हा उद्देश समोर ठेवून शासनाने शिवभोजन थाळी मोफत सुरू केली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कळमनुरी ३, हिंगोली ३, वसमत २, सेनगाव १ आणि औंढा येथे २ असे शिवभोजन थाळीचे केंद्र उघडण्यात आले आहेत. शिवभोजनाची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. शिवभोजन थाळीसाठी वेळ कमी ठेवण्यात आला असल्यामुळे काहींंच्या नशिबी थाळी राहत नाही. शिवभोजन थाळीमध्ये २ पोळ्या, १ भाजीे, वरण आणि भात असे पदार्थ ठेवले आहेत. थाळीतील जेवण रुचकर असल्याची प्रतिक्रियाही लाभार्थिनी दिली. दुसरीकडे थाळीतील भाजी व पोळ्यांची संख्या वाढविल्यास पोटभर जेवण मिळेल, असे काही लाभार्थींचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळीकेंद्र -११
रोजच्या थाळी लाभार्थींची संख्या १२००
शहरातील एकूण शिवभोजन केंद्र- ३
शहरातील थाळी लाभार्थींची संख्या ४००
अंदाजे १५ जण उपाशी परतात...
हिंगोली शहरात नाईकनगर, सरकारी दवाखाना व नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे शिवभोजन थाळी केंद्र कार्यान्वित आहे. जेवणासाठी ११ ते ४ अशी वेळ दिली आहे. बहुतांशवेळा वेळेअभावी व थाळी संपल्यामुळे जवळपास जवळपास १५ जणांना जेवण न करताच घरी परतावे लागते. शिवभोजन थाळीमध्ये सध्या दोन पोळ्या व एक भाजी दिली जात आहे. शासनाने या शिवभोजन थाळीत तीन पोळ्या व एक भाजी वाढवून दिल्यास जेवण पोटभर होईल, असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. शिवभोजन केंद्रावरील थाळी संपल्यास काहींना उपाशीपोटीच परतावे लागत आहे.
रोज १ हजार ६०० लोकांचे भरते पोट; मग बाकीच्यांचे काय?
शासनाने गरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू केली आहे. यामुळे गरिबांना अन्न मिळत आहे. जिल्ह्यातील ११ केंद्रांवर जवळपास १ हजार ६०० जण रोज जेवण करतात. केंद्र चालकांना शासनाकडून १५० शिवभोजन थाळी मिळते. पण ती थाळी अपुरी पडत आहे. शासनाने गरीबांचा विचार करून आणखी ७५ थाळी वाढवून देणे गरजेचे असताना मागणीचा काही शासन विचार करीत नाही, असे केंद्र चालकांचे म्हणणे आहे.
फाेटाे नं. ०७