लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रत्येकाला आपल्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे, महिला व शालेय विद्यार्थिनींनी निर्भय बनावे, त्यांच्या संरक्षणार्थ पोलीस दल सदैव पाठीशी खंबीर राहील, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी केले. हिंगोली शहर ठाण्यात ६ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपधीक्षक गृह सुजाता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोनि अशोक मैराळ, पोनि जगदीश भंडरवार, स्थागुशाचे पोनि मारोती थोरात यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी हजर होते. पुढे बोलताना चिरंजीव प्रसाद म्हणाले, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलात नव-नवीन बदल केले जात आहेत. विशेष म्हणजे आॅनलाईन तक्रार पद्धतीमुळे घर बसल्या तक्रार नोंदविणे शक्य झाले आहे. महिलांनी व शालेय विद्यार्थिनींनी निर्भय बनावे, अत्याचार होत असल्यास पोलिसांना कळवावे, असे त्यांनी सांगितले. चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते फिरती व्हॅन, महिला विश्रांतीगृह तसेच कम्युनिटी हॉलचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी निर्भया पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने निर्भया समितीच्या सदस्या, विद्यार्थिनी तसेच महिलांची उपस्थिती होती.पोलीस आपल्या दारी’पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या सूचनेनुसार पोनि जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुप्रिया केंद्रे, राजेश ठोके, अशोक धामणे, ज्योती खिल्लारे, प्रतिभा घुगे, संतोष बंडे यांची नियुक्ती फिरते पोलीस ठाण्यासाठी करण्यात आली. पोलीस ठाण्यापासून लांब अंतरावरावरील फाळेगाव येथे प्रथम भेट देऊन तेथील नागरिकांच्या तक्रारी समजावून घेतल्या.
प्रत्येकाला अधिकारांची जाणीव झाली पाहिजे -विशेष पोलीस महानिरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 12:27 AM