२२ जुलै रोजी शासनाच्या सूचनेप्रमाणे सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत जिल्हा रुग्णालयातील १२ ओपीडीमध्ये मधुमेय ८, मोतीबिंदू शस्त्रक्रिया ३, रक्तदाब ११ आदी जवळपास १४१ रुग्णाची आस्थेवाईकपणे तपासणी करण्यात आली. यानिमित्त सर्व विभागामध्ये तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आरोग्यम् धनसंपदा अभियान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश टेहरे, डॉ. दीपक मोरे, डॉ. अजय शिरडकर, डॉ. फैजल खान, डॉ. इम्रान खान, डॉ. शेळके, डॉ. मनीष बगडीया, डॉ. गणेश शिंदे, डॉ. नंदकिशोर करवा, डॉ. एन. आर. अग्रवाल, डॉ. विनोद बिडकर, डॉ. नितीन सोनी, डॉ. संजय देशमुख, डॉ. राजू नरवाडे, डॉ. डोणेकर, आंनद साळवे, केळकर, रोशनी गौरकर आदींची उपस्थिती होती.
'आरोग्यम धनसंपदा' अभियानांतर्गत १४१ रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:19 AM