वसमत ( हिंगोली) : शहरातील कवठा रोड परीसरातील स्मशानभूनित नग्नावस्थेत २० वर्षीय तरुणाचे कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
वसमत कवठा मार्गावर आसलेल्या स्मशानभूमीत आज सकाळी स असलम स सरफराज (२०, रा बुखारी तकीया) या तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे गुप्तांग कापलेले असून शरीरावर जखमा दिसून येत होत्या.ही माहीती शहर पोलीसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम,दिलीप पोले,शेख नय्यर यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते. पाहणी केली आधार कार्ड सापडल्याने ओळख पटली. शहर पोलीसांनी घटनास्थळाची पूर्ण पाहणी करून तपास सुरू आहे.