लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्या 'वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा' या योजनेमध्ये वीजचोरीची माहिती देणाºया मागील ३ वर्षांत सुमारे ४१ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. जेवढी वीजचोरी त्याच्या १० टक्के रक्कम संबधित माहिती सांगणाºयास दिली जाते.वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे राज्यभरात वीजचोरी करणाºयाविरूद्ध सातत्याने मोहिमा राबविण्यात येतात. परंतु काही वीजग्राहक नवनवीन शक्कल वापरून वीजचोरी करीतात. अशा वीजचोरीची माहिती देणाºया वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरुपात बक्षीस म्हणून देण्यात येते. वीजचोरी करणाºया ग्राहकाने तडजोड रकमेसह वीजचोरीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच बक्षीस देण्यात येत असून माहिती देणाºयाचे नाव देखील गुपित ठेवण्यात येते. २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षात अशा स्त्रोतांद्वारे वीजचोरीच्या ३६ ठिकाणची माहिती मिळाली. या ठिकाणी महावितरणच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत सुमारे ४ कोटी १० लाखांची वीजचोरी उघडकीस आली असून ही संपूर्ण रक्कम वीजचोर ग्राहकांकडून वसूल करण्यात आली आहे. योजनेनुसार या वीजचोरीची १० टक्के रक्कम माहिती देणाºया रोख स्वरूपात बक्षीस रुपाने देण्यात आली आहे. याबाबत व्हिडीओ कॉन्फर्सिंगमध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ज्या भागात जास्त वीजचोºया आहेत, त्या भागात भरारी पथकाने सातत्याने भेटी द्याव्यात. तसेच स्थानिक जनतेच्या सहकार्याने वीजचोरांविरूध्द कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत. वीजचोरी पकडण्यासाठी सर्व मंडळस्तरावर भरारी पथकांची स्थापना केली आहे.
४१ लाखांची वीजचोरी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:19 AM