कौठा (हिंगोली) : वसमत तालुक्यातील कवठा परिसरात दिनांक आठ जुलैच्या रात्रीपासून नऊ जुलैच्या सकाळी पाचपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या परिसरातील नदीसह ओढे नाले यांना आलेल्या प्रचंड महापुराने किनोळा गावात पाणी घुसले असून कवठा किनोळा इत्यादी भागातील शेतीचेही अतोनात नुकसान झाले आहे.
कवठा गावाजवळून वाहणारी असणा नदीसमोर किनोळा गावातला भेटते. तसेच किनोळा गावाला कुरुंदा नदी सोमठाणा नाला कुरुंदानाला अशी एकूण दोन नद्या व तीन नाले एकत्र येतात. रात्रीच्या जोरदार पावसाने असणा नदीसह कुरुंदा नदी व नाले ओढे यांना प्रचंड महापूर आल्याने हे सर्व पाणी किनोळा गावात घुसली. सर्वजण झोपेत असताना अचानक आलेल्या महापुराने धांदल उडाली.
गावातील मंदिर जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत कार्यालयासह अनेक घरात पुराचे पाणी घुसले. यामुळे अनेकांचे संसार उपयोगी साहित्य रस्त्यावर वाहून गेले. असणा नदी काठावरील नेमकेच पेरणी झालेल्या शेतीचेही मोठे नुकसान झाले असून जमिनी उकरल्या गेल्या. तर उभ्या पिकामध्ये पाणी साचल्याने पिके हातून गेली आहेत.
याचप्रमाणे कवठा कुरुंदा मार्गावरील तोंडपुशी ओढ्यालाही मोठा पूर आल्याने जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. अगोदरच उशिरा झालेली पेरणी आणि आता प्रचंड महापूर यामुळे या परिसरातील शेतकरी पूर्णतःहतबल झाला आहे. सन १९८३ नंतर यावर्षीच महापूर किनोळा गावात आल्याचे ग्रामस्थ पंजाबराव जाधव, मारुतराव जाधव, विठोरे यांनी सांगितले.