हिंगोली : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी पुढे करत औंढा तालुक्यातील अजरसोंडा येथील आदिनाथ गोविंदराव राखोंडे ( वय २७) या युवकाने बुधवारी रात्री घरात विजेच्या ताराला धरून आत्महत्या केली.
मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाच्या युवकांवर युवकांना नोकरी लागत नाही शैक्षणिक सुविधा पासूनही मराठा समाजाचे मुले, मुली वंचित राहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आदिनाथ हा आरक्षण मिळत नाही म्हणून अस्वस्थ होता बुधवारी 8 नोव्हेंबर रोजी त्यांनी घरातील विद्युत प्रवाह असलेल्या तारेला घट्ट पकडले यामुळे त्याला जोराचा धक्का बसला. या घटनेत आदिनाथ चा मृत्यू झाला. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. युवकाच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, पत्नी, सहा महिन्याची मुलगी आहे.