प्रतिक्रिया
१) ६ नोव्हेंबर २०१६ मध्ये दारूबंदीसाठी गावात मतदान झाले होते. आडवी बाटली झाल्याने महिलांच्या आंदोलनाला यश आले होते; परंतु कालांतराने दारूबंदीचा फज्जा उडाल्याने छुप्या मार्गाने दारूविक्री होत असल्याचे अनेक वेळा दिसून आले असल्याचे माजी सरपंच भगवान शिंदे यांनी सांगितले.
२) दारूबंदीसाठी सक्रियपणे आंदोलन छेडून शासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे दारूबंदीसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये महिलांच्या एकतेचा विजय होत बाटली आडवी झाली; परंतु लपून दारूविक्रीचा प्रकार सुरूच हाेता. दिवसेंदिवस यामध्ये वाढ झाल्याने अनेक जण व्यसनी बनले. यामुळे सद्यस्थितीला गावातील कायम दारूबंदीसाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे शुभांगी मुंजाजीराव शिंदे यांनी सांगितले.
३) गाव दारूमुक्त असावे या दृष्टिकोनातून दारूबंदीसाठी महिलांनी आंदोलनाद्वारे गावातील दारू बंद केली; परंतु दारू विक्रीचे प्रकार सुरूच आहेत. अवैध मार्गाने दारूविक्री होत असल्याने त्याविरुद्ध पोलीस प्रशासन व दारूबंदी विभागाने लक्ष देत कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिभा सोपानराव शिंदे यांनी सांगितले.
४) गावात दारूबंदी नावाच राहिली आहे. अवैध मार्गाने दारूविक्री सुरू आहे. कायम दारूबंदी व्हावी अशी आमची मागणी असल्याचे कांचन प्रशांत शिंदे यांनी सांगितले.
५) अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर दोनपेक्षा जास्त गुन्हे झाल्यास मोपो ९३ प्रमाणे कारवाई केली जाईल, त्यानंतरही दारू विकताना आढळल्यास त्यावर हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे. अवैध दारूविक्री करणाऱ्यांची गुप्तपणे माहितीद्वारे कारवाई करण्यात येईल अशी माहिती कुरुंदा ठाण्याचे सपोनि सुनील गोपीनवार यांनी सांगितले, तसेच ज्या भागात अवैध दारूविक्री सुरू आहे, त्याची माहिती नागरिकांनी पोलीस प्रशासनाला देण्याचे आवाहन केले.