खडीकरणाचे काम सुरू
हिंगोली : शहरातून जाणाऱ्या हिंगोली रोडच्या खडीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वे पटरी ते अकोला बायपास दरम्यानचे काम सुरू असून १६ जानेवारी रोजी दोन्ही बाजूने खडीकरण करण्यात येत होते. यावर दगडी चुरी टाकली जात असल्याने वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे यावर हॉट मिक्स डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
खड्डे बनले धोकादाय
हिंगोली: हिंगोली ते नांदेड दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर जागोजागी खड्डे पडले आहेत. उमरा, सावरगाव, कळमनुरी, माळेगाव फाटा परिसरातील खड्डे तर धोकादायक बनले आहेत. काही दिवसांपूर्वीच या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र थातूरमातूर बुजविलेले खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांतून करण्यात येत आहे.
उमेदवार समर्थक लागताहेत पैजा
हिंगोली: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले आहे. मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. आता आपल्याचे पॅनलचा उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा उमेदवार समर्थक करीत आहेत. अनेक ठिकाणी तर समर्थक पैजा लावत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी कोणता उमेदवार निवडून येणार हे १८ जानेवारी रोजी समजणार आहे.