लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या शेतकरी आस्मानी संकटासह सुलतानी संकटात सापडला आहे. अशातच कृषी विभागाने मागील पाच वर्षापासून राबविण्यात येणा-या ‘मशरुम’ च्या शेतीमुळे शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील वर्षी या कार्यक्रमाचा जवळपास २०० शेतक-यांनी लाभ घेतल्याचे सांगितले जात असून, यंदा १३२ शेतक-यांची आॅनलाईन नोंदणी झाल्याचीही माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.मागील चार ते पाच वर्षापासून शेतक-यांवर निसर्गाची अवकृपा दिसून येते, ती यंदाही कायम आहे. महागडे बी- बियाणे शेतीत टाकून कधी- कधी त्याचा प्रवास सुरु होण्यापूर्वीच नायनाट होतो तर कधी प्रवासादरम्यान नायनाट होतो. शेवटच्या टप्यापर्यंत मिळणा-या उत्पन्नातून मात्र शेतक-यांचा भांडवली खर्चही निघणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकरी शेतीला जोडधंदा करण्याच्या तयारी दाखवित आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभागाकडे शेतीला जोड व्यवसाय करण्यासाठी अनेक योजना राबविल्याजातात. आता मागील पाच वर्षापासून अनुदान तत्वावर शेतक-यांसाठी ‘मशरुम’ हा कार्यक्रम राबविला जात आहे. याचबरोबर शेतक-यांना शेत तळे, विविध शेतीची अवजारे इ. प्रकारचे साहित्यही या कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन दिले जातात. यंदाही १ कोटी २५ लाख रुपयाचे उद्दिष्ट असून, ते दर वर्षी पुर्ण होत असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगितले जाते. मात्र पाहिजे तशी जनजागृतीच होत नसल्याने हा कार्यक्रम खरोखरच शेतक-यांपर्यंत पोहोचत असेल का, हा एक प्रश्नच आहे. कार्यक्रमात १ कोटी २५ लाख रुपयाचे उद्दिष्ट असून, लाभार्थ्याच्या मागणीनुसार साहित्य पुरविले जाते. तर ‘मशरुम’ साठीही पूर्ण साहित्य उपब्लध करुन दिले जाते. तर मशरुमला मुंबई, हैदराबाद या ठिकाणी सर्वाधिक जास्त मागणी असते.साडेतीनशे ते चारशे रुपये प्रति किलाने प्रमाणे ओल्या मशरुमची तर वाळवलेल्या मशरुमला ८०० रुपये प्रति किलो पर्यंत भाव मिळतो.---दिलासा : आॅनलाईन नोंदणीचे आवाहनआजघडीला अर्ध्याउबार खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र पाऊसच नसल्याने, जमिनीबाहेर निघालेली पिके सुकून जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुन्हा शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत मात्र ही मशरुमची शेती शेतक-यांना फायद्याची ठरणार आहे. योजनेंतर्गत २० जून पर्यंत अर्ज दाखल करुन घेण्यात येणार आहेत. पावसामुळे हैराण झालेल्या शेतक-यांसाठी ‘मशरुम’ ची शेती खरोखर उत्पन्न देणारी ठणार हे मात्र निश्चित. सध्या वलाना येथील एक शेतकरी मशरुम पासून हजारो रुपयाचे उत्पन्न घेत आहे.---कार्यक्रमास मंजुरी नाहीदर वर्षीही योजना राबविण्यात येत असली तरीही अद्याप या कार्यक्रमास मंजुरी मिळालेली नाही. अर्ज प्रक्रिया दाखल झाल्यानंतर या कार्यक्रमाला मंजुरी मिळणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगितले.
‘मशरुम’ च्या शेतीचा शेतकऱ्याला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:28 PM
सध्या शेतकरी आस्मानी संकटासह सुलतानी संकटात सापडला आहे. अशातच कृषी विभागाने मागील पाच वर्षापासून राबविण्यात येणा-या ‘मशरुम’ च्या शेतीमुळे शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील वर्षी या कार्यक्रमाचा जवळपास २०० शेतक-यांनी लाभ घेतल्याचे सांगितले जात असून, यंदा १३२ शेतक-यांची आॅनलाईन नोंदणी झाल्याचीही माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.
ठळक मुद्देहिंगोली : जिल्ह्याला १ कोटी २५ लाखांचे उद्दिष्ट