लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोयाबीनला शासनाने ३ हजार ३९९ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला, तरीही व्यापारी २ हजार ३०० ते २ हजार ७०० रुपये प्रतिक्वंटल दराने खुलेआम खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे.हमीभावामध्ये चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला ३ हजार ३९९ रुपये दर आहे. मात्र व्यापारी हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी दराने खरेदी करत असल्याने शेतकºयांची फसवणूक होत असल्याचा प्रकार वसमत बाजारपेठेत सर्रासपणे घडत आहे. तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नुकसानीच्या भितीपोटी सोयाबीन काढणीला वेग आला आहे. शेतकरी सोयाबीन काढणीनंतर सरळ बाजारात आणत असल्याने व्यापारी आद्रतेच्या नावाखाली शेतकºयांची लूट करत आहेत. शेतमाल परत नेण्यास वाहतूकीचा खर्च अंगावर पडत असल्याने शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करत आहेत. विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनची आद्रता किमान दहा पर्यंत असावी. अशी शासनाची अट आहे. मात्र व्यापारी आद्रता जास्त असल्याच्या नावाखाली कवडीमोल भावाने सोयाबीन खरेदी करत आहेत. सद्यस्थितीत येथील नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू नाही. अल्पभूधारक शेतकºयांना शेतमाल वेळेवर विकल्याशिवाय पर्याय नसतो. त्यातच हमीभाव खरेदी केंद्रावर चूकाºयाची वर्षवर्ष वाट पहावी लागते. अशा अनंत अडचणींमुळे शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडते त्यामुळे शेतकºयांना व्यापाºयांना शेतमाल विकल्याशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याची अडचण शेतकरी व्यक्त करत आहेत.बाजार समितीचे सचिव सोपान शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या सोयाबीनला कमी दर मिळत असेल तर बाजार समितीच्या शेतमाल तारण योजनेअंतर्गत शेतमाल ठेऊन त्याचा लाभ घ्यावा, वसमत येथे नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावात व्यापाºयांनी शेतमाल खरेदी करावा. हमी भावाच्या कमी दराने जर शेतमालाची खरेदी करणाºया व्यापाºयांवर गुन्हे दाखल करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आज बाजारात हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी किंमतीने सर्रास सोयाबीनची खरेदी होत आहे. तरी अद्याप तालुक्यात एकाही व्यापाºयावर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाºया व्यापाºयांवर गुन्हे दाखल करण्याच्या घोषणेचे काय? असाही प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.शासन व्यापाºयांचीच बाजू घेतेसोयाबीन कितीही वाळवले तरी आद्रता कमी होत नाही. व्यापारी मनमानी पध्दतीने आद्रता ठरवून कवडीमोल दामात सोयाबीन खरेदी करत आहेत. शासनाने मोठ्या थाटात हमीभाव जाहीर केला. मात्र शासन व्यापाºयांची बाजू घेत असल्याने शेतकºयांची फसवणूक होत आहे.- पांडूरंग सोळंके, शेतकरी रा. लिंगी ता. वसमत
‘आद्रतेच्या’ नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:37 AM