लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतक-यांना मागील तीन ते चार वर्षापासून विविध संकटाना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच प्रती क्विंटल सोयाबीनवर मिळणारे २०० रुपयाचे अनुदानही मोजक्याच शेतक-यांच्या पदरात पडल्याने अनुदान न मिळालेले शेतकरी कृउबा मध्ये अनुदानाच्या मागणीसाठी खेटे घेत असल्याचे दिसून येत आहे.सोयाबीन अनुदानासाठी जिल्ह्यातुन ७ हजार ९२० शेतकºयांनी कृउबाकडे प्रस्ताव दाखल केले होते. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर याला कुठे महूर्त लागून शेतकºयांच्या अनुदानास वरिष्टस्तरावरुन मंजुरी मिळून ६ हजार ९५० शेतकºयांच्या खात्यात अनुदान पडल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तर ३२२ शेतकºयांनी दिलेली खाते क्रमांक चुकीची असल्याने त्यांच्या खात्यात अनुदान टाकणे शक्य नाही. चुकीची खाते क्रमांक देणाºया शेतकºयांशी संपर्क करुन त्यांच्याकडून खाते क्रमांक मागवून घेणे सुरु असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र या ठिकाणी नियमित १० ते १५ शेतकरी सोयाबीनच्या अनुदानाच्या चौकशीसाठी येत असल्यचे चित्र आहे. येथे चौकशीसाठी आलेल्या शेतकºयां समोर कृउबाचे कर्मचारी नावाची यादी टाकत असून, ‘त्या यादीत नावे तुम्हीच शोधा आणि आम्हाला दाखवा’ असा सपाटा लावला आहे. त्यामुळे येथे आलेले शेतकरीही गोंधळून जात आहेत. मोजक्याच शेतकºयांना यादीत नावे सापडत आहेत. तर नावे न सापडणाºया शेतकºयांना पुन्हा - पुन्हा यादी चाळण्याचा सल्ला दिला जात आहे. परत यादी चाळूनही नावे सापडले नाहीत तर आता तुम्हीच सांगा आम्ही काय करणार? असेही कर्मचाºयांतून बोलले जात आहेत. तसेच बँकेतून चुकीची खाते नंबर असलेल्या याद्याही शेतकºयांच्या समोर ठेवल्या जात आहेत. त्यामुळे दोन दोन याद्या पाहून शेतकरी हैराण होऊन आल्या त्या पावली परतत आहेत. त्यामुळे शेतकºयांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या कारभाराला कंटाळून बरेच शेतकरी स्वत:हून विचारपूस करीत नसल्याचेही येथे आलेल्या शेतकºयांतून बोलल्या जात आहे. सध्या तूर कापणी जोरात सुरु असून तीकडे दुर्लक्ष करुन अनुदानासाठी धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे रोजंदारी बुडत असल्याचेही शेतकरी सांगत होते.प्रत्येक फेरीत शेतकºयांना वेग वेगळी करणेशेतकरी निसर्गा समोर तर हतबल झालेच आहेत. त्यातच बरोबर त्यांना शेती माल विक्री करतानाही अनेक अडचणीचा सामना करावा लागला. एवढेच काय तर शेती माल विक्री करण्यासाठी शेतकºयांना अनेकदा मुक्कामीही राहण्याची वेळ आली होती. आता पुन्हा सोयाबीन अनुदानासाठी शेतकºयांना कृउबात खेटे घेतल्या शिवाय पर्यायच नाही. सोयाबीनचे अनुदान मागण्यासाठी आलेल्या शेतकºयांना प्रत्येक फेरीत वेग- वेगवेगळी कारणे सांगितली जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन सोयाबीनचे अनुदान देण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.
हिंगोलीत सोयाबीन अनुदानासाठी शेतक-यांचे खेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:37 PM
शेतक-यांना मागील तीन ते चार वर्षापासून विविध संकटाना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच प्रती क्विंटल सोयाबीनवर मिळणारे २०० रुपयाचे अनुदानही मोजक्याच शेतक-यांच्या पदरात पडल्याने अनुदान न मिळालेले शेतकरी कृउबा मध्ये अनुदानाच्या मागणीसाठी खेटे घेत असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देपर्याय काढा : शेतकरी याद्या वाचून - वाचून झाले हैराण; निराशाने परतत आहेत शेतकरी