आंबाचोंडी : आंबा सर्कलमध्ये सर्वच गावातील शेतकऱ्यांनी पिकविमापोटी ऑनलाइन रक्कम भरून पावती घेतली. परंतु, आंबाचोंडी येथील एक-दोन शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई मिळाली. पिकविमा नुकसान भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन खा. राजीव सातव यांना दिले आहे.
यावर्षीच्या सततच्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नैसर्गिक १०० टक्के नुकसान झाले. पण गावातून १ व २ शेतकऱ्यांना पिकविमा नुकसान भरपाई मिळाली. कारण त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मार्फत पंचनामे केले होते. पण बाकी शेतकऱ्यांना अद्यापही कोणताही प्रकारचा विमा मिळालेला नाही. पिकविमा कंपनीकडून पिकविमा दिला जात नसेल तर या कंपनीने संबंधीत शेतकऱ्यांना पिकविमा भरण्यासाठी आलेला खर्च द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. आतापर्यंत विमा न मिळाल्यामुळे पिकविमा विरोधात ५५ शेतकऱ्यांनी खा. राजीव सातव यांच्याकडे तक्रार केली आहे. या निवेदनावर भारत भोसले, यशवंत धवसे, दशरथ खुळखुळे, यादव गायकवाड, अमजद बेग, सचिन जाधव, मारोती भोसले, संतोष वाघमारे, दत्तराव बालगुडे आदी जवळपास ५५ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आ. राजू नवघरे, खा. हेमंत पाटील यांनी लक्ष द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.