हिंगोली : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी गणित विषयांत अधिक प्रगत व्हावेत, त्यांना संख्याज्ञान सहज व सोप्या भाषेत अवगत होण्यासाठी जिल्हाभरात पाढे दृढीकरण सप्ताह राबविण्यात आला.एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारानुसार शाळेतील बालकांची गुणवत्ता वाढविणेही आता तितकीच महत्वाची आहे. त्या अनुषंगाने सर्व शिक्षा अभियान तर्फे प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय मुलभूत गणित क्रिया यामध्ये संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी गणित, गुणाकार व भागाकार अवगत असणे गरजेचे आहे. परंतु गणितात विद्यार्थी मागे असल्यामुळे या विषयात त्यांना अधिक प्रगत करण्यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्हाभरात पाढे दृढीकरण सप्ताह राबविण्यात आला आहे. १ जानेवारीपासून सदर सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. याबाबत संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले होते. पाढे दृढीकरण सप्ताहचा अहवाल गशिअ यांनी छायाचित्रांसह सर्व शिक्षाकडे आणुन देण्याच्या सूचनाही संबधित अधिकाºयांना देण्यात आल्याची माहिती सर्वशिक्षाचे एपीओ एस. टी. भाले यांनी सांगितले.
गणित विषयासाठी जिल्हाभरात पाढे दृढीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 11:29 PM