शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

पाच वेळा दृश्यम पाहून आई-वडिलांसह भावाचा काढला काटा; अपघाताचा बनाव उघडकीस

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: January 15, 2024 5:23 PM

मुलगाच निघाला मारेकरी; प्रारंभी दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज होता.

हिंगोली : दुचाकी अपघातात आई-वडिलांसह भावाचा मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीने तिघांचा खून करण्यापूर्वी पाच वेळा दृश्यम चित्रपट पाहिला. यातूनच त्याला तिघांचा खून करण्याची कल्पना सूचली. ही घटना तालुक्यातील डिग्रस वाणी शिवारात ११ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून आणखी कोणी यात सहभागी आहे का? याचा तपास करीत आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी शिवारात एका नालीत ११ जानेवारी रोजी दुचाकीसह कुंडलिक श्रीपती जाधव (वय ७०), कलावती कुंडलिक जाधव (वय ६०) व आकाश कुंडलिक जाधव (वय २७ तिघे रा. डिग्रस वाणी) या तिघांचे मृतदेह आढळून आले होते. यात बासंबा पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून तपास सुरू केला. प्रारंभी दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज होता. मयत कुंडलिक जाधव यांचा दुसरा मुलगा  आरोपी महेंद्र जाधव याने सुद्धा हॉस्पीटलला जाताना तिघांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला असावा, अशी माहिती बासंबा पोलिसांना दिली.

पोलिसांनी महेंद्र जाधव यास अधिक माहिती विचारली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याच्या बोलण्यावरून त्याचेविषयी संशय बळावला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासासाठी रवाना केले. पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, बासंबा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. पथकाने घटनास्थळी व मयतांच्या घरी भेट देवून पाहणी केली. यावेळी घरात एका ठिकाणी रक्ताचा डाग आढळून आला. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यावरून पथकाने महेंद्र जाधव यास चौकशीसाठी ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला. यात त्याने तिघांचा खून करून अपघाताचा बनाव केल्याची कबुली दिली.  

दृश्यम चित्रपटातून सूचली कल्पनाआई-वडिल व भाऊ हे पैसे देत नव्हते. नातेवाईकांमध्ये बदनामी करतात याचा महेंद्र जाधव याच्या मनात राग होता. यातूनच त्याने तिघांनाही संपविण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने दृश्यम चित्रपट पाच वेळा पाहिला. तसेच क्राईम पेट्रोल मालिकाही पाहिली. यातूनच खून कसा करावा, याची त्याला कल्पना सूचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 

असा काढला काटा९ जानेवारी रोजी आरोपी महेंद्र याने भाऊ आकाश जाधव यास झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्यास विजेचा शॉक देवून डोक्यात रॉड मारून खून केला. त्याच रात्री मृतदेह गावाजवळील रोडलगत नाल्यात टाकला. त्यानंतर १० जानेवारी रोजी दुपारी आई कलावती जाधव यांना झोपेच्या गोळ्या देवून शेतात नेले. तेथे डोक्यात रॉड घालून खून केला व मृतदेह रोडलगत आकाश जाधव याच्या मृतदेहाशेजारी टाकला. परत घरी येऊन मध्यरात्री वडिलांना सुद्धा झोपेच्या गोळ्या देवून डोक्यात रॉड मारून त्यांचा खून केला. वडिलाचा मृतदेह दुचाकीवर टाकून आई व भावाच्या जवळ दुचाकीसह टाकून दिला. कोणाला संशय येऊ नये म्हणून दुचाकीचे हेडलाईट फोडून अपघात झाल्याचा बनाव केल्याचे आरोपी महेंद्र जाधव याने पोलिसांना सांगितले.  

विकास पाटील, शिवसांब घेवारे, विलास चवळी यांची विशेष कामगिरीपोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तिहेरी खून प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, बासंबा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी, उपनिरीक्षक गुलाब खरात, पोलिस अंमलदार नानाराव पोले, बाबाराव धाबे, राहूल तडकसे, उमर शेख, राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने विशेष कामगिरी केली. 

झोपेच्या गोळ्या देणारे टार्गेटवरआरोपी महेंद्र याने झोपेच्या गोळ्या वाशिम येथून आणल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार झोपेच्या गोळ्या देणारे डॉक्टर व मेडिकल चालक पोलिसांच्या रडारवर आहेत. तसेच या घटनेत आणखी कोणी सहभागी आहेत का? याचाही तपासही पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली