लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आचारसंहिता लागूनही पितृपक्षामुळे पक्षीय उमेदवाऱ्यांचे भिजत घोंगडे कायम आहे. मतदारसंघ एक अन् इच्छुक अनेक असे चित्र सगळीकडेच आहे. पक्षश्रेष्ठीने प्रत्येकालाच कामाला लागण्याचा सल्ला दिला. मात्र काहीजण मुंबईच्या वा-या करीत असल्याने कामाला लागलेल्या दुस-याचे मन प्रचारात लागत नाही. स्वकीयच घात करतो का? या भीतीने पोखरले आहे.हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीत आ.डॉ.संतोष टारफे व हिंगोलीत आ.तान्हाजी मुटकुळे यांनाच पक्षश्रेष्ठींनी खºया अर्थाने हिरवी झेंडी दाखविल्याचे त्यांच्या एकंदर वागण्यातून दिसत आहे. इतरांकडे तो आत्मविश्वास नाही. वरिष्ठांनीही या सर्व मंडळींना आॅक्सिजनवरच ठेवले आहे. हिंगोलीत काँग्रेसमध्ये माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे एकमेव इच्छुक उरल्याचे कालपर्यंत चित्र होते. मात्र दुसºया गटाला कोणी विचारतही नसल्याने त्यांनी पुन्हा दावेदारी मांडली. कुरघोडीचे हे राजकारण या टप्प्यापर्यंत कायम आहे. मात्र काही जणांनी मध्यस्थी करून हे दोन गट एकत्र आणण्याचे शिकस्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात काही प्रमाणात यशही आल्याचे सूत्रांकडून रात्री उशिरा कळाले.कळमनुरीत सेनेचे संतोष बांगर कामाला लागले आहेत. मात्र सेनेत माजी खा.शिवाजी माने यांचा प्रवेश होणार असल्याच्या अफवेने ते हैराण झाले आहेत. दुसरीकडे मतदारसंघ सुटेल की नाही, हे माहिती नसले तरीही भाजपमध्ये माजी खा.माने व माजी आ.गजानन घुगे यांच्यातील चुरसही एकमेकांची बेचैनी वाढवत आहे. वसमतमध्ये विद्यमान आ.जयप्रकाश मुंदडा यांना अजूनही हिरवी झेंडी मिळाली की नाही, हे गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे येथे आता अॅड.शिवाजी जाधव यांच्या सेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र ते भाजपचेच उमेदवार असतील, अशा वल्गनांमुळे सैनिकही सावधच आहेत. युती तुटली तरच हे शक्य आहे.राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर व राजू नवघरे यांच्यापैकी एक आता यादी जाहीर झाल्यावरच समोर येणार असल्याचे दिसते. तोपर्यंत ही मंडळीही आॅक्सिजनवरच राहणार आहे. तूर्त जिल्ह्यात सगळेच या एकाच दबावाच्या मानसिकतेतून जात असून एकमेकांवर लक्ष ठेवून आहेत.
विरोधकांपेक्षा स्वकियांचीच बसली धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:37 PM