मागे असल्याचे सद्य: स्थितीतील आकडेवारीवरुन पहायला मिळत आहे.
१६ जानेवारी रोजी कोरोना व्हॅक्सीन लस देण्यास सुरुवात करण्यात आली. प्रारंभी यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली व उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी ही दोनच केंद्रे होती. १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ. दीपक मोरे, डाॅ. स्नेहल नगरे, प्राचार्य रमा गिरी यांनी लस घेतली. ताप येणे, अंग दुखणे, डोके जड पडणे आदी प्रकारच्या तक्रारीही अनेकांनी केल्याचेही पहावयास मिळाले.
जि. प. आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार ९ फेब्रुवारीअखेर जिल्ह्यात एकूण ४ हजार १५ जणांनी लसीकरण केले आहे. यापैकी हेल्थकेअर वर्कर्स ३ हजार ३३३ व फ्रंट वर्कर्स ६८२ जणांचे लसीकरण झाले आहे. तालुकानिहाय हिंगोली जिल्हा रुग्णालय १२७०, कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय ११२०, ग्रामीण रुग्णालय औंढा ४९८, ग्रामीण रुग्णालय सेनगाव ७३३, उपजिल्हा रुग्णालय वसमत ५९६ जणांनी लसीकरण केले आहे.
सुरुवातीला म्हणजे १६ जानेवारी रोजी ६ हजार ५०० लस आली होती. अजून ५ हजार ५०० ूकोरोना व्हॅक्सीन लस आलेली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
जिल्ह्याचे लसीकरणाचे लक्ष्य ६५०० एवढे असून लसीकरण ३७५३ झाले आहे. टक्केवारीमध्ये पाहिले तर मेडीकल ऑफीसर ८० टक्के , फिल्ड हेल्थ वर्कर ८५ टक्के, मेडीकल विद्यार्थी ५० टक्के, नर्स आणि सुपरवायझर ८० टक्के, पॅरॉमेडीकल स्टाफने ५० टक्के लसीकरण केले आहे.
लसीकरण कोणीही टाळत नाही
लसीकरणासाठी सर्वजण उत्साही आहेत. पहिल्या दिवसांपासून कोरोना लस घेण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका आदी उत्साहीत आहेत. कोरोना लस घेतल्यानंतर सुरुवातीला थोडा ताप येवून अंग दुखते म्हणून कोणी थांबत नाही. काही जण स्वत: नाव नोंदणी करीत असून सुटी जोडून लसीकरण करुन घेत आहेत.-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली