लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : सार्वजनिक रस्त्यावरुन नालीत सिमेंटचा पाईप टाकत असताना त्यावरून ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून वाद झाला. यात एकास फायटरने तोंडावर मारून जखमी केले. याप्रकरणी तिघांविरूद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येथील दिलीप पंडितराव जाधव हे २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक रोड जवळ नालीत सिमेंटचा पाईप टाकत होते. यावेळी तेथे एकजण ट्रॅक्टर घेऊन आला. सिमेंट पाईपवरून ट्रॅक्टर नेऊ नये असे सांगितले असता रोड काय तुझ्या बापाचा आहे का? असे म्हणत एकाने फायटरने नाकावर मारून जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दिलीप पंडितराव जाधव यांच्या फिर्यादीवरून मारोती उर्फ बंटी कुंडलिक जाधव, कुंडलिक मारोतराव जाधव, पंकज कुंडलिक जाधव या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि नागनाथ दीपक करीत आहेत.हिंगोलीतही युवकास फायटरने मारहाण४हिंगोली : आदर्श महाविद्यालय परिसरात एका युवकास फायटरने मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपींविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदनगर येथील युवक निशांत जगन्नाथ मुंडे हा आदर्श महाविद्यालय परिसरातून रस्त्याने जात होता. यावेळी निशांत यास काही जणांनी रस्त्यात अडवून दगड फेकून मारला. याबाबत निशांत याने जाब विचारला असता, आरोपी फिर्यादीस म्हणाले की, तू आम्हाला ओळखत नाहीस का, आम्ही पप्पू चव्हाण यांचे माणस आहोत. असे म्हणून निशांत यास लाथाबुक्क्यांनी व फायटरने जबर मारहाण केली. याप्रकरणी निशांत मुंडेच्या फिर्यादीवरून आरोपींविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फायटरने मारहाण करून केले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:17 AM