लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील सापटगाव येथील यात्रेत ग्रामीण जिल्हा पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तमाशा फडावर अचानक धाड टाकली. यावेळी यात्रेत कुंटणखाना चालविणाºया १४ महिलांवर कारवाई करत सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सापटगाव येथील यात्रेत तमाशाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस अधिकाºयांनी उघडकीस आणला. हा प्रकार मोठ्या प्रमाणात राजरोसपणे केला जात असल्याने यात्रेचे पावित्र्य धोक्यात आले आहे. या प्रकाराविरोधात सर्वसामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत असताना मात्र याकडे सेनगाव पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे यात्रेतील या प्रकाराविरोधात थेट वरिष्ठ अधिकाºयांनाच यात्रेत येऊन कारवाई करण्याची वेळ आली. २५ जानेवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दुल गनी यांनी पथकासमवेत यात्रेतील तमाशा मंडळाच्या तंबूवर अचानक धाड टाकली. यावेळी १४ आरोपी महिलांनी इतर महिलांना फुस लावून यात्रेत स्वताच्या फायदासाठी देहविक्री करायला भाग लावत, कुंटणखाना चालविला जात असल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात पथकाने ताब्यात घेतलेल्या १४ महिलांवर उपविभागीय पोलीस अधिकारी गणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.सीसीटीव्ही कॅमेरे केले लंपासहिंगोली शहरातील एका दुकानासमोर लावलेले अंदाजे ११ हजार रूपये किमतीचे दोन सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी सचिन जायभाये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहरात दिवसेंदिवस चोºयांचे प्रमाण वाढत आहे. दुकाने फोडून ऐवज लंपास केल्याच्या यापूर्वीही घटना घडल्या आहेत.५ हजार रूपये दंड वसूलअवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर पोलिसांनी २५ जानेवारी रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध ठाण्यांच्या हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया २७ वाहन चालकांकडून पोलिसांनी ५ हजार ४०० रूपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामधोमध वाहन उभे करणाºया, वर्दीळीच्या रस्त्यावरून वाहने सुसाट पळविणाºयांविरूद्ध पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी मोहीम राबविण्यात येते. परंतु मुख्य मार्गावररून सर्रासपणे अवैध वाहतूक धावत असल्याचे चित्र आहे.
कुंटणखाना चालविणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:05 AM